सर्व केशरी रेशनकार्ड-धारकांना  रेशन मिळावे  
 - डॉ. दानिश लांबे, अध्यक्ष - स्टार फाऊंडेशन 





माणगांव (प्रतिनिधी) :
 संपूर्ण देशामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले असताना त्याला रोखण्यासाठी शासन व प्रशासन योग्य निर्णय घेत आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये त्यासाठी वेगवेगळ्या विभागातून मदतीचे हात पुढे येत आहेत, तसेच शासनाने ३ महिने मोफत अन्नधान्यची घोषणा  केली असली तरी सर्व केशरी रेशनकार्ड धारकांना आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे उत्पन्न ५०००० रू. पेक्षा जास्त असल्यामुऴे अथवा SRC क्रमांक नसल्यामुळे अशा  कारणास्तव रेशन मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने कोकणात व मुंबई मध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या स्टार फ़ाऊंडेशन या संस्थेने व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी शासनाचा अन्न व नागरी पुरवठा विभागाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या कार्यालयांशी पत्रव्यवहार करून संपर्क साधला व संस्थेचे अध्यक्ष डॉ. दानिश लांबे यांनी स्वतः अन्न व नागरी पुरवठा मंत्री विश्वजीत कदम यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून सर्व केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य मिळावे हा मुद्दा मांडला आणि त्याचे प्रथित यश देखील मिळत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
डॉ. दानिश लांबे यांनी स्टार फाउंडेशन संस्थेमार्फत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे,पुणे, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हांमध्ये आवश्यकता असणाऱ्या सुमारे ३०० सर्व जाती-धर्माचा अत्यंत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले  आहे व या  संस्थेच्या वेगवेगळया कार्यालयातून सुमारे ३००० "आयुष्मान भारत कार्ड" देखील लॉकडाऊच्या आगोदर बनवण्यात आले होते,या कार्डच लाभ कोरोना संकटात मोफत तपासणी व इलाज करण्यासाठी होईल.
स्टार फाउंडेशन रायगड  जिल्हा सचिव मोहसीन दरेखान यांनी  पत्रकारांशी संवाद साधताना असे म्हणाले  की,आम्ही  स्टार फाउंडेशनच्या  कार्यकर्त्यांचा हा उद्देश आहे के जे स्थानिक रोज कष्ट (मेहनत) करून आपली उपजीविका पूर्ण करत होते व या लाँकडाऊनमुळे त्यांचे हाल होत आहेत परंतु स्वतःला गरीब न बोलता कुठल्याही संस्थेकडे मदतीचा हाथ पसरत नाहीत आहेतअशा स्वाभिमानी लोकांची काळजी घेणे  सुद्धा आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्थेची व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. कारण मागणारे लोक तर पुढे येऊन  संस्थेकडून मदत घेत आहेत पण स्वाभिमानी कष्टकरी मागत नाहीत. तर अशा सर्व  स्थानिक केशरी रेशनकार्ड धारकांना  शासना कडून लॉकडाऊन संपेपर्यंत  रेशनिंग  मिळावे असे आमचे प्रयत्न आहेत.
 तसेच आम्ही हे आवाहन करत आहोत की महाराष्ट्र सरकारच्या निर्णय व योजनेनुसार ज्या कोणी रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळण्यास  त्रास होत असेल अथवा धान्य मिळत नसेल त्यांनी स्वतःच्या व आपल्या गाव/शहर/ मोहल्ल्यामधील अन्य रेशन कार्ड धारकांच्या  प्रति सहित आपल्या भागातील स्टार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.
जेणेकरून आपल्या  भागातील  समस्या समजून त्या समस्यांचे निदान त्या त्या भागातील पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क करून  करता येईल.

Popular posts from this blog