माणगांव तालुक्यातील साई येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील साई रास्त भाव धान्य दुकानाच्या माध्यमातून ११ एप्रिल रोजी शासनाकडून आलेले मोफत धान्य वाटप करण्यात आले. या वेळेस शासनाकडून फक्त प्रत्येक माणसी ५ किलो तांदूळ देण्यात आले आहेत. सदर धान्य वाटपाचा शुभारंभ माणगांव पंचायात माजी उपसभापती गजानन अधिकारी, साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेन रहाटविलकर, समाजसेवक काशिराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

देशातील कोरोना व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामूळे सर्वसामान्य जनतेचे हाल व उपासमारी होऊ नये या दृष्टीकोनातून शासनाने मोफत धान्य वाटप करण्याचे घोषित केले आहे.


साई येथील रास्त भाव धान्य दुकानाचे मालक शहाबुद्दीन इस्माईल जुवले यांच्याकडे साई परिसरातील अंत्योदय व केशरी कार्डधारक संख्या ८५० असून त्यांनी गावातील प्रमुख व्यक्ती जवळ संपर्क करुन शासनाकडून मोफत तांदूळ आले असून माणसी ५ किलो तांदूळ देण्यात येणार असल्याची माहिती दिली. शासनाने जाहिर केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन कार्डधारकांमध्ये योग्य ते अंतर ठेवून धान्य वाटप करण्यात आले. यावेळी साई ग्रा.पं. उपसरपंच प्रकाश धुमाळ, सदस्य सत्तार सोलकर, उमर सोलकर यांनी रास्त भाव धान्य दुकानाला भेट दिली. मोफत तांदूळ मिळत असल्यामूळे जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog