🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
कोरोना मुक्तीच्या बंदोबस्तातही माणगांव पोलीसांनी केली गावठी दारू आणि हातभट्यांवर मोठी कारवाई 


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) :
रायगड जिल्ह्यातील माणगांवचे कर्तव्यदक्ष डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद आणि कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे, पोलीस हवालदार स्वप्निल कदम, रवींद्र म्हात्रे, सौ. सुनिता सानप, सौ. दया पाटील, पोलिस नाईक सुनील शिरसाठ, पोलिस शिपाई विनायक चांदूरकर, शाम शिंदे, राम डोईफोडे आणि श्रेयस म्हात्रे यांच्या टीमने मोठ्या धाडसाने  माणगांव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रांतर्गत सोमवार दिनांक २० एप्रिल आणि मंगळवार दिनांक २१ एप्रिल या दोन दिवसात मोर्बा विभागातील साई, विहुले, सुर्ले माणगांव पूर्वेकडील होडगांव, माणगांव लगतच्या नाणोरे आदिवासी वाडी, उत्तेखोल आदिवासी वाडी आणि खांदाड आदिवासी वाडी येथील गावठी दारू आणि हातभट्यांवर धाड टाकून घटनास्थळी सापडलेल्या गुळ मिश्रित दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन जागेवर पूर्णपणे उध्वस्त केल्यामुळे त्यांच्या या धाडसी कामगिरीचे संपूर्ण माणगांव तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी व लाॅकडाऊनचे आदेश संबंधित सरकारी यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पोलीसांच्या दैनंदिन कामकाजावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. पोलीसांना आपल्या दैनंदिन कामकाजा बरोबर कोरोना मुक्तीच्या या राष्ट्रीय लढ्यासाठी अाहे कौटुंबिक जीवन बाजूला ठेवून अहोरात्र ड्यूटी करावी लागत आहे.

कोरोना विषाणू मुक्तीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र सुरू असलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीमुळे सद्या सर्वत्र सर्व प्रकारची देशी विदेशी दारु दुकाने आणि बियर बार बंद असल्याने तळीरामांचे आणि गावठी दारू निर्मिती करणाऱ्यांचे वेगवेगळे प्रताप सुरू झाले आहेत. तसेच लाॅकडाऊन मुळे मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबई व उपनगरातून आपापल्या गावी आले आहेत. त्यामुळे गावठी हातभट्टी दारुचे अड्डे विविध गावात चालू असल्याच्या माहितीवरुन काही ठिकाणी तेथील स्थानिक पोलीस पाटील यांचे मदतीने वरील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त असून सुद्धा आपल्या कर्तव्यात कुठेही कसर न करता पोलीस बंदोबस्त सांभाळून संबंधित गावठी दारू निर्मिती आणि हातभट्यांवर त्या त्या ठिकाणी मोठ्या शिताफीने धाड टाकून चांगली कामगिरी केली आहे. व पुढेही अशीच कारवाई चालू राहील. असे माणगांवचे डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद आणि पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांनी म्हटले आहे.

Popular posts from this blog