🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून निजामपूर विभागातील विक्रम रिक्षा चालकांना अन्नधान्य वाटप 


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लाॅकडाऊन संचारबंदी लावली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व विक्रम, रिक्षा आणि मिनिडोअर चालकांच्या विक्रम, मिनिडोर आणि रिक्षा घरी जाग्यावर उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आर्थिक सोर्स बंद झाला आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदतीचा हात देण्यासाठी माणगांव, महाड आणि पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले नेहमीप्रमाणे पुढे आले.
       रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील दोनशे दहा विक्रम रिक्षा चालकांना माणगांव, महाड, पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांनी माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांच्या उपस्थितीत अन्नधान्य वाटप करण्यात आले.
      याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, प्रमोदशेठ घोसाळकर, विभाग प्रमुख प्रसाद गुरव, सुधीर पवार, प्रणव कोळवनकर, दत्ताराम नाडकर पाटील, निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
         तसेच अपोलो चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड बैंक यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५७ रक्त दात्यांनी रक्त दान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आमदार गोगावले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Popular posts from this blog