रायगडमध्ये पोलादपुर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला


६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण






माणगांव (प्रतिनिधी) : 
रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यामध्ये एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संसर्गित व्यक्ती ६३ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. प्राप्त माहितीनुसार संबधित महिलेच्या तब्येतीत काही दिवसांपूर्वी अचानक बिघाड झाला व श्वसन यंत्रणेचा त्रास व्हायला लागल्यामुळे तिला महाड मधील सुप्रसिद्ध ह्रदयरोग स्पेशालिस्ट डॉ. आदित्य म्हामणकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र प्रक्रुतीत सुधारणा न झाल्याने सदर पेशंटला कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आले. आज दि १८ एप्रिल रोजी या महीलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. संपुर्ण रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड मधील एक ते दोन तालुके वगऴता कोरोना संसर्गित रुग्ण दक्षिण रायगड मध्ये कुठेही आढऴले नव्हते मात्र काल दिनांक १७ एप्रिल पासून डाऊन ट्रॅक रायगड मधील ग्रामीण भागात कोरोनाच्या चाचण्या पॉझिटीव्ह येत आहेत तरी परगावावरुन आलेल्या व होमक्वारंटाईन केलेल्या सर्व प्रशासनाचे आदेश येत आहेत की घरीच रहा सुरक्षित रहा स्वत: च्या आरोग्याची काऴजी घ्या व सार्वजनिक आरोग्य जपा असे अवाहन सर्व प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहेत. काल श्रीवर्धन मधील एका ५१ वर्षीय व्यक्तीची चाचणी पॉझिटीव्ह आली. यामुऴे  दक्षिण रायगड मधील आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन तत्पर झाले आहे.
प्रशासनाने संबधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणी साठी पाठवले असल्याचे समजते. तसेच रुग्ण दाखल केलेले महाडमधील हॉस्पिटल देखील सील करण्यात आले आहे केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन करून सुद्धा प्रशासन आपले कार्य चोख बजावत असताना लोकांचा हलगर्जीपणा व कोरोना संसर्गा विषयी गांभीर्य नसल्याचे दिसुन येत तर काही काही सुजाण नागरिकांकडुन "अभी नही सुधरेंगे तो कभी नही सुधरेंगे" अशा सकारत्मक प्रतिक्रिया देखील ऐकावयास मिऴत आहेत. तसेच प्राथमिक निदान कऱणारे डॉ. आदीत्य म्हामणकर यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया आमच्या प्रतिनिधीशी व्यक्त केल्या आहेत.

Popular posts from this blog