पन्हळघर बुद्रूक ग्रामपंचायतमध्ये कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना



माणगांव (प्रतिनिधी) :
संपूर्ण देशासह जगाला  हादरवणाऱ्या कोरोना व्हायरसचे बळी दिवसागणिक वाढत असून संपूर्ण देश ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासन योग्य रितीने परिस्थिती हाताळत असून तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून योग्य वेळी दिले जात आहेत.

माणगाव तालुक्यातील पन्हळघर  बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोरोना व्हायरसला गावात येण्याआगोदर कोरोना पळवण्यासाठी  कोरोना  नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. ग्रामस्थांना गाव सोडण्यास बंदी घातली असून वैद्यकीय कामासाठीच बाहेर जाण्याची परवानगी दिली जात आहे.  जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी आठवड्यातून एकदाच सकाळी ७ ते ११ च्या दरम्यानच घरातील एकाच व्यक्तीने बाजारपेठेत जाण्याची ताकीत दिल्याने व गावाबाहेरील व्यक्तीस प्रवेश निषिद्ध केल्याने पन्हळघर ग्रामपंचायतीने  गावात येणाऱ्या व्यक्तीस कोरोना  नियंत्रण कक्षातून येण्यास यावे लागत असल्याने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी  ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबविल्याने प्रशासनाकडून देखील पन्हळघर ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे विशेष कौतूक होत आहे.  सरपंच अपेक्षा अशोक जाधव, उपसरपंच राम सिताराम भोस्तेकर,पोलीस पाटील सदानंद सखाराम वातेरे  ग्रामसेवक आदेश नथुराम तेटगुरे, कर्मचारी विजय सखाराम जाधव, कोतवाल संतोष मेरुकर, मुख्याध्यापक नारायण ढेपे, अंगणवाडी सेविका सुषमा भोनकर, मोरे मॅडम, मदतनीस कविता नवाले, आशा सेविका कविता जाधव, पन्हळघर बुद्रूक तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण घोगरेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ कोरोनाला रोखण्यासाठी विशेष काळजी घेत आहेत.

Popular posts from this blog