लॉकडाऊनमध्ये एसटी पार्सल कर्मचारी व हमाल यांच्यावर उपासमारीची वेळ, शासनाने लक्ष देण्याची मागणी
माणगांव (इंद्रनील पाटील) : सद्या राज्यात कोरोना ने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण यंत्रणा जागच्या जागी थांबली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जीवनवाहिनी असे संबोधले जाणारी महाराष्ट्राची राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच आपली सर्वांची एसटी सेवा आपल्याला विविध राज्यांमध्ये सेवा देण्याचे काम करते. त्यातली एक सेवा म्हणजे एसटी पार्सल कुरियर सेवा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गुजरात राजस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये व्यापार सुविधा पुरवत असते. त्याचप्रमाणे एप्रिल ते मे महिना हा कोकण करांसाठी मोठा आंबा सिझन म्हणून पहिला जातो.
म्हणून कोकणामध्ये एसटी पार्सल ऑफिस सुरू असतात. परंतु सद्या संपूर्ण एसटी सेवा बंद असल्याने येथील पार्सल ऑफिस कामगार तसेच हमाल यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन तसेच एसटी प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे असे सर्व स्तरातून मागणी होत आहे. कोकणातील काही स्टेशन असे आहेत की जिथे फक्त एप्रिल आणि मे मध्ये पूर्ण वर्षाचे इन्कम केलं जातं. कोकणात अंबा सीजन अतिशय मोठा मानला जातो. परंतु एसटी बस बंद असल्याने आंब्याची कोणतीही वाहतुक एसटी बस ने होत नाही त्याचा मोठा फटका येथील पार्सल प्रतिनिधी कामगार व हमाल यांना बसला आहे. तरी शासनदरबारी नोंद घेऊन कामगारांना न्याय मिळावा अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.