नियम फाट्यावर मारून कंपनी घेते कामगारांना कामावर?



खालापूर (संतोष शेवाळे) :
देशात सध्या कोरोनोने थैमान घातला असून त्याचा फायदा खालापूरमधील काही कंपन्यांनी उचलला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून कामगारांची वाहतूक करताना दिसत आहे.
खालापूर तालुक्यातील बिस्किटे उत्पन्न करणारी पारले जी कंपनीने कामगार वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. ही कंपनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून वाहतूक करतांना निदर्शनास आले आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्या बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे अनेक कामगार कामावर जात नाहीत. एकीकडे कोरोनामुळे कामगारांना प्रवास करताना वाहने मिळत नाहीत तर दुसरीकडे कंपनी व्यवस्थापन कामगारांवर कामांवर येण्यासाठी भीती दाखवत आहेत. त्यामुळे कामगारांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. तसेच पारले कंपनीमध्ये महिला वर्ग जास्त प्रमाणात काम करीत आहेत.
कंपनीमधील कोणी एक ब्रिजेश नामक व्यक्ती महिलांना कामावर येण्यासाठी दबाव आणत आहे. अशा या बेजबाबदार व्यक्तीस ताबडतोब कामावरून कमी करून महिलांची पिळवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
ग्रामीण भागात असलेल्या हुतामाकी (रानसई), पारले जी, (किरखिंडी) सुरक्षित अंतर न ठेवता कामगारांना कामांवर घेत असल्याने कोरोना वाढीसाठी जणू काय कंपनीच प्रयत्न करीत आहे असे चित्र पहावयास मिळत आहे.

Popular posts from this blog