जन स्वाभिमान बहुउद्देशीय संघटना, महाराष्ट्र तर्फे गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व खाऊचे वाटप


अलिबाग (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आलेले असून अशा परिस्थितीत संचारबंदीमुळे अनेक गरजू कुटूंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटूंबांना मदतीची अपेक्षा असते. दरम्यान, अशा गरजू कुटूंबांना जनस्वाभिमान बहुउद्देशिय संघटना, महाराष्ट्र तर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे.
जन स्वाभिमान बहुउद्देशीय संघटना, महाराष्ट्र तर्फे श्री समर्थ कृपा वृध्दधाम, परहूर येथे रेशन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
या संघटनेमार्फत कावाडे, रेवस, नवखार येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याबद्दल सर्व लाभार्थी कुटुंबानी संघटनेचे आभार मानले आहेत. या संघटनेतर्फे समीर राणे, गुरुनाथ पाटील, जगदीश घरत, गुंजाळ सर, मनोज शिर्के, प्रणय पाटील, कंठक मॅडम आदींनी गरजू नागरिकांसाठी हा समाजोपयोगी उपक्रम राबविला. 

Popular posts from this blog