नमस्कार मित्र मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 


माणगांव (प्रतिनिधी) : 
कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लाॅकडाऊन केल्याने हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांवर उमासमारीची वेळ येऊ नये तसेच देशाच्या पंतप्रधानांच्या आवहानाला प्रतिसाद देत निजामपूर विभागातील नमस्कार मित्र मंडळातर्फे बोंडशेत आदिवासी वाडी येथील कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या भयानक स्थितीने देशात हाहाकार माजवला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निजामपूर विभागात जनजागृती व मास्कचे वाटप नमस्कार मित्र मंडळांच्या माध्यमातून करण्यात आले. सामाजिक भान ठेऊन नमस्कार मित्र मंडळने समाजहिताचे अनेक उपक्रम आजपर्यंत राबविले आहेत. कोरोना कसा हरवायचा याबद्दल विभागात मार्गदर्शन करण्यात आले. हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नमस्कार मित्र मंडळाचे अध्यक्ष अॅड. इंद्रजीत गायकवाड, उपाध्यक्ष संतोष (बावा) मानकर, सचिव दिपेश जाधव, खजिनदार शाम मानकर, माजी अध्यक्ष जगदीश मानकर, विनोद चव्हाण, राजू मानकर विजय मानकर, प्रफुल्ल पवार आदी कार्यकर्त्यांनी केले.

Popular posts from this blog