प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मागणीला यश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना आजपासून पेट्रोल पंपावर मिळणार पेट्रोल 


देगलूर (प्रतिनिधी) :
कोरोनारूपी संकटाचा सामना करताना प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली भूमिका खंबीरपणे मांडत आहे. पत्रकारिता करीत असताना वास्तविकता समोर आणण्यासाठी पत्रकारांना रस्त्यावर यावे लागते. तसेच अनेकांच्या संपर्कात रहावे लागते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. कोरोनाच्या या भयानक संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार बांधव आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील पत्रकारांना देगलूर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होत नाही ही बाब लक्षात घेऊन देगलूर येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या  वतीने देगलूर येथील तहसिलदार अरविंद बोळगे यांना वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीची पूर्तता करत तहसीलदारांनी सर्व पेट्रोल पंप धारकांना, विक्रेत्यांना पत्रकारांना पेट्रोल देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष विशाल पवार, तालुका अध्यक्ष अस्लम शेख, शहर अध्यक्ष हबीब रहेमान आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Popular posts from this blog