रायगड जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या जीवनावश्यक गरजांकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे : डाॅ. संजय सोनावणे
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : देशासह राज्यात सर्वत्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुजन समाजातील सर्व जनतेला जीवनावश्यक वस्तूंची फार मोठी गरज भासत आहे. त्यामुळे या समाजाकडे कडे रायगड जिल्हाच्या विद्यमान पालक मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी रायगड जिल्हातील दानशूर व्यक्तीमत्व नामवंत उद्योजक, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संजय सोनावणे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींजवळ बोलताना सागीतले.
डाॅ. संजय सोनावणे यांनी म्हटले आहे की, देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढतच चालला असल्याने रायगड जिल्ह्यातील बहुजन समाजातील अनेक कुटूंब अशी आहेत की ती रोज हातावर कमवून खाणारी आहेत. देशातील लाॅकडाऊन मुले या कुटुंबातील लोकांवर मोठी उपास मारीची वेळ आली असून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य बहुजन समाजातील अनेक व्यक्ती शासकीय नोकरदार नाहीत. तर काही खासगी कंपनीत काम करतात लाॅकडाऊनमुळे खाजगी कारखाने देखील बंद झाले असून या कोरोनाच्या प्रादुर्भावने भयभीत झालेले मुंबईतील चाकरमनी देखील नोकरी-धंदा सोडून गावाला आल्यामुळे या कुटूबांना एक वेळचे जेवण मिळणे देखील या पुढे कठीण होणार असून अशा कुटूंबातील लोकांना रायगड जिल्हाचे खासदार सुनीलजी तटकरे, तसेच विधान परिषदचे आमदार आनिकेत तटकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी लक्ष घालून या गरीब व गरजू कुटूंबातील लोकांना अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा शासनामार्फत पुरवठा करावा अशी मागणी डाॅ. संजय सोनावणे यांनी केली आहे.