ऐन लॉकडाऊन कालावधीत खांब विभागात विजेचा खेळखंडोबा


खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) : 
ऐन लॉकडाऊन कालावधीत खांब विभागात वारंवार विजेचा खेळखंडोबा वाढू लागल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तर्फे ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. वाढलेल्या लॉकडाऊनमुळे २४ तास नागरिकांना आपल्याला घरातच बंदीस्त करुन घ्यावे लागत आहे. अशा वेळी आपला वेळ निघून जावा यासाठी टि.व्ही.वरील कार्यक्रम पाहण्याला नागरिक पहिली पसंती दर्शवित आहेत. परंतु वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने कार्यक्रम पाहण्यात व्यत्यय तर येत आहेच. त्याशिवाय वाढत्या गरमीमुळे पंख्याशिवाय एक क्षणही निघून जात नसल्याने नाहक गरमीचाही त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने रात्रीची झोपही पूर्ण होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. तर चिमुकल्या मुलांना तर पंख्याशिवाय रात्री झोपविणे मोठे दिव्याचे होऊन बसले आहे. लॉकडाऊनमुळे महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घरातच आपला वेळ काढावा लागत असल्याने खंडीत होणारा विद्युत पुरवठा म्हणजे एक मोठी समस्याच होऊन बसली आहे.

Popular posts from this blog