माणगांव बाजारपेठ तीन दिवस बंद, कोरोना पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने निर्णय 


माणगांव (उत्तम तांबे) :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन माणगाव शहरातील अत्यावश्यक सेवा असलेले रुग्णायय व औषधाची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने गुरुवारपासुन म्हणजेच २, ३ व ४ एप्रिल रोजी पूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. याबाबतची बैठक माणगांव नगरपंचायत या ठिकाणी ३१ मार्च रोजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान स्वच्छता व आरोग्य समिती सभापती रत्नाकर उभारे, माणगाव व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष गिरीश वडके, भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांचे विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. कोरोना विषाणूने जगभर हाहाकार उडविला आहे. त्यामुळे जगातील जनता या विषाणूने धास्तावली आहे. या विषाणूपासून माणगाव तायुक्यातील नागरिकांचा बचाव व्हावा हा उद्देश नजरेसमोर ठेऊन सर्व दुकान मालकांनी स्वयंस्फूर्तीने गुरुवारपासून सलग तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पुढे ५ एप्रिल रोजी जीवनावश्यक वस्तुंची म्हणजेच भाजीपाला, दुध, किराणामाल, चिकन, मटण, मच्छी यांची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानंतर पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती रत्नाकर उभारे यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना दिली. माणगावमधील सर्व दुकाने, रुग्णालये व औषधाची दुकाने ही अत्यावश्यक सेवा वगळून कोरोना पाश्वभूमिवर गर्दिचे प्रमाण कमी होण्यासाठी सलग तीन दिवस बंद करण्याची मागणी नगरपंचायत माणगांवकडे करण्यात आली आहे.

Popular posts from this blog