माणगाव नगरपंचायत मार्फत जाहिर आवाहन 


माणगांव (उत्तम तांबे) : माणगाव नगरपंचायत मार्फत जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, कोरोना साथीमुळे सद्या मुंबई, पुणे व इतर शहरामध्ये कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे काही नागरिक इतर शहराकडून शासनाने जारी केलेल्या लॉक डाऊनचे आदेश मोडून आपल्या माणगाव शहरात, गावात, वस्तीत, वाडीत, परिसरात, घरात व कॉम्प्लेक्समध्ये कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता येऊन राहण्याची शक्यता वाढलेली आहे.                   सदरील व्यक्ती कोरोना बाधीत असल्यास तिचा संसर्ग इतर परिसरामध्ये होऊन, धोका निर्माण होऊन आपल्या माणगाव शहरामध्ये मोठे संकट निर्माण होऊ शकते. तरी आपल्या परिसरात बाहेर गावाहून आलेली व्यक्ती आढळून आल्यास माणगाव नगरपंचायतीस अथवा आपल्या प्रभागाचे नगरसेवक, नगरसेविका यांना त्वरित संपर्क साधून माहिती द्यावी.


माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नांव गोपनीय ठेवले जाईल. तरी या गंभार परिस्थितीत दक्षता घेऊन, कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्व माणगांवकर नागरिकांनी नगरपंचायतीस सहकार्य करावे असे माणगाव नगरपंचायत मार्फत नम्रते पूर्वक आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog