विश्व हिंदू परिषदेतर्फे तळा तेथे अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
माणगांव (भिवा पवार) :
विश्व हिंदू परिषद, रायगड तर्फे तळा प्रखंडातील निराधार व गरजू बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे (तेल, कांदे, बटाटी, तूरडाळ, हरभरे, जिरा, मोहरी, लसून व मसाले) वाटप चालू करण्यात आले. तसेच कोरोना वायरस या विषाणू पासून होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.
आंबेली आदिवासी वाडी, परीट आळी व खांबोली आदीवासी वाडी असे ऐकून १३ कुटुंबांना अन्न धान्य वाटप करण्यात आले. या समाज कार्यात श्री. गणेश मानकर, श्री. विजय धामणकर, श्री. प्रशांत सकपाळ, श्री. भरत तळकर, श्री. अंकित खेडेकर, श्री. विशाल लाड व श्री. विशाल कदम आणि श्री. राहुल तळकर यांनी सहभाग घेतला.
तळा प्रखंडातील गरजू बांधवांनी स्थानिक कार्यकर्त्यांना संपर्क करावा असे आवाहन विश्व हिन्दू परिषदेने केले आहे.