अवैद्यरित्या दारुविक्री करणाऱ्यांवर श्रीवर्धन पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची संयुक्त कारवाई
रायगड (किशोर केणी) :
नजीकच्या काळात भारतात अतिवेगाने पसरणाऱ्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणू प्रादर्भावावर नियंत्रण घालण्याकरीता मा. पंतप्रधान, भारत सरकार यांनी संपूर्ण देशात संचार बंदी घोषित केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांच्याकडील जा.क्र.साशा/कार्या-1/ब-5/आ.व्य./करोना विषाणू/प्रतिबंधात्मक उपाययोजना/2020 दिनांक 18/3/2020 अन्वये रायगड जिल्हयातील सर्व परवाना धारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करणे बाबत आदेश पारित केले आहेत. तथापि काही समाज विघातक घटक सदर आदेशांची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती मिळत होती. त्यामुळे अशा प्रकारे छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करणेचे आदेश मा.श्री.अनिल पारस्कर पोलीस अधीक्षक रायगड यांनी श्री. जे.ए.शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सर्व पोलीस ठाणे यांना दिले होते.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनाक 03/05/2020 पर्यंत लॉककडाऊन जारी करण्यात आले असून सदर लाकडाऊन मध्ये जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी जिल्हातील परमिट रूम व इतर दारूची दुकान बंद करण्याचे आदेश असताना दिनांक 16/04/2020 रोजी सुमारास श्रीवर्धन येथे साईनाथ बारच्या बाजूस शासनाने लागू केलेल्या कलम 144 आदेशाचा भंग केला म्हणून आरोपी नं. 1 रा. कुभांरआळी, ता.श्रीवर्धन, आरोपी नं. 2. रा.गणेश आळी, ता.श्रीवर्धन, आरोपी क्र 3. रा. शिवाजी चौक, ता. श्रीवर्धन यांनी एकूण 2,09,980/-रुपये किंमतीची विदेशी दारू बाळगले स्थितीत मिळून आला. सदर गुन्ह्यातील 03 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे गु.र.नं 10/2020 भा.दं.वि.सं कलम 188, दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (e), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास श्रीवर्धन पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक खीरड हे करीत आहेत.
सदर छापा कारवाईचे माध्यमातून अशा आणीबाणीच्या प्रसंगी शासनाने पारित केलेल्या आदेशांची जाणीवपूर्वक पायमल्ली करुन आपले नजीकच्या परिसरात छप्या पध्दतीने सरु असलेल्या देशी-विदेशी दारु गांजा चरस व इतर अंमली पदार्थाच्या विक्रेत्यांबाबत माहिती असल्यास/मिळाल्यास तात्काळ त्याबाबतची माहिती तसेच अत्यावश्यक वस्तूमध्ये समाविष्ट केलेले मास्क, सॅनिटायझर, जिवनावश्यक वस्तू, इत्यादींचा साठा केल्याचे किंवा त्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यास त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला अगर पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे समस्त नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.
सदरची छापा कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचीन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व श्रीवर्धन पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथकाने केली आहे.