स्वच्छतादूत, पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी लिलावती रूग्णालयात

रायगड (किरण बाथम) :-
देशाचे स्वच्छतादूत, पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (दि. ४) लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ही माहिती श्रीसदस्यांना समजल्यानंतर खळबळ उडाली आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वय ७४ वर्षे आहे. त्यामुळे त्यांची नियमीत तपासणी पुण्यातील एका रुग्णालयात होते. यावेळी पहिल्यांदाच ती मुंबईतील लिलावती रुग्णालयात होणार आहे. मात्र आप्पासाहेबांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी रायगडात पसरली आणि जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली.
दरम्यान, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लिलावती रुग्णालयात नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खणखणीत असून काळजी करण्यासारखे काही नाही. शुक्रवारपर्यंत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहनही प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.

Popular posts from this blog