बौ. पं. स. सभापती आनंदराज आंबेडकर यांचे माणगांवमध्ये स्वागत 



माणगाव (उत्तम तांबे) : महाड ऐतिहासिक भूमीमध्ये २० मार्च २०२० रोजी बौद्धजन पंचायत समिती मुंबई यांच्या विद्यमाने चवदार तळे क्रांतीदिनाच्या ९४ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर खबरदारी म्हणून हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरी तेथील क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बौ. पं.स. सभापती आनंदराज आंबेडकर महाडकडे रवाना होत असताना माणगाव येथे आले असता बौ. पं. स. ता. अध्यक्ष रविंद्र मोरे, सरचिटणीस आर. डी. साळवी, माजी ता. अध्यक्ष उत्तम तांबे, माजी सरचिटणीस पराग जाधव, शा. क्र .१ सरचिटणीस विनोद मोरे तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले.


२० मार्च १९२७ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निसर्गनिर्मीत पाणी तमाम बहुजन समाजाला प्यायला मिळावे हा मानवी मुलभूत अधिकार देण्यासाठी महाड येथील चवदार तळ्यावर समता संगर केला होता. या ऐतिहासिक चवदारतळे क्रांती दिनाला २० मार्च २० रोजी ९४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुशंगाने बौ. पं. स. मुंबईच्या वतीने महासभेचे आयोजन करण्यात आले होते .परंतु सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या साथीचा महाभयंकर आजार पसरल्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यांच्या आदेशाचे पालन व आपले कर्तव्य म्हणून बौ. पं. समितीने हा नियोजीत कार्यक्रम रद्द केला. मात्र या क्रांतीदिनी बौ. पं. स. सभापती आनंदराज आंबेडकर महाड नगरीत आवर्जुन उपस्थित राहून क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.


महाड चवदार तळे सत्याग्रहदिना निमीत्ताने २० मार्च रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबोडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी देशभरातील हजारोच्या संखेने अनुयायी व भिमसैनिक येत असतात. त्यांच्या जीवीतास कोरोना (महामारी) या साथीच्या आजाराचा धोका ऊद्भवू नये याबाबत दक्षता घेण्यासाठी परेल मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली होती. दरम्यान, महाड शहरामध्ये संशयित कोरोनाग्रस्त १५ रूग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच शासनाच्या आदेशानुसार व जनतेची मोठी साथ मिळाल्यामुळे महाडमधील सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

Popular posts from this blog