कोरोनाच्या संकटामुळे नाभिक समाजसंघ कारागिर विंवचनेत, सरकारकडे मदतीसाठी हाक
माणगांव (प्रतिनिधी) :
कोरोना संकट आणि केंद्र व राज्य प्रशासनाद्वारे जाहिर केलेल्या उपाय योजनांचे स्वागत करताना रायगड जिल्हा नाभिक तरुण संघच्या वतिने गटई कामगारांना त्याचा थेट फायदा व्हावा या साठीच महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज बांधवांना या योजनेचा फायदा मिळावा व आरोग्य सुविधांचा ही लाभ मिळावा अशी मागणी होत आहे. कोरोना संकटाने नाभिक समाजसंघ कारागिर विंवचनेत आहेत त्यानी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. पुढील एकवीसदिवस व या आधीचा जवळपास आठवडा व पुढे अनिश्चीत काळ त्यांच्या व्यवसायावर थेट परिणाम होत आहे.
अजुन किती काळ ही लढाई चालेल हे सांगु शकत नाही. मे महिन्यानंतर शाळा-काॅलेज, थकित विजबीले, घरभाडे, किराणा अशा अनेक समस्यांना नाभिक समाज कसा सामोरा जाईल ? याची चिंता त्यांना सतावत आहे. अशा आणिबाणीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाभिक समाज दुकानदार संघटना मधिल कारागीरांना सढळ हस्ते आर्थिक मदत करावी अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ च्या वतिने माणगांव तहसिलदारां मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती अर्जाद्वारे करण्यात आली असल्याची माहीती या जिल्हा संघटनेचे सचीव सुदाम शिंदे यांनी दिली. जिल्हा विश्वस्त दत्तात्रेय (भाऊ) पांडे यांच्याहस्ते माणगांव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा संघटक जयंत शिंदे, नाभिक समाजाचे युवा पत्रकार प्रसादजी शिंदे व कार्यक्षम नेतृत्व सौरभ पांडे उपस्थित होते.