राष्ट्रीय हितासाठी कोरोना महामारीच्या भयंकर परिस्थितीतही पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकार आपल्यासाठी रस्यांवर, त्यांना सहकार्य करा
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : कोरोना व्हायरसच्या विश्वव्यापी महामारीच्या भयंकर पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शासन निर्मित लॉकडाऊन च्या गंभीर परिस्थितीतही लोकहितार्थ या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करण्यासाठी आपले पोलीस, डाॅक्टर्स आणि पत्रकार आपला जीव धोक्यात घालून जराही मागे न सरता आपले राष्ट्रीय आणि नैतिक कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा आदर राखून त्यांना सहकार्य करा. कोरोना व्हायरसचे संक्रमण व संसर्ग टाळण्यासाठी आणि या महाभयंकर विषाणूला आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी वैद्यकीय सुविधा व अत्यावश्यक कामाशिवाय कृपया विनाकारण घरातून बाहेर पडू नये. आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण देशातील निष्पाप जनता संकटात येवू शकते. म्हणून नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे आणि संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावे. लाॅकडाऊन च्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांना सहकार्य करावे. नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे काही ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये नाहक वाद होत आहेत. त्यामुळे पोलीसांना नाइलाजाने लाठीचा वापर करावा लागतो आहे. राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणारे पोलीस, डॉक्टर्स, नर्स,पत्रकार व शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान व आदर करून त्यांना सहकार्य करावे. सरकार जे जे निर्णय घेत आहे ते आपल्याच हिताचे आहेत.
शासनाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून लॉकडाऊन मध्ये विनाकारण बाहेर पडलेल्या काही बेजबाबदार हावशानवशांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेवू नये. या महाभयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाला व पोलीसांना सहकार्य करा. म्हणून नागरिकांनी नियम पाळा आणि कोरोना टाळा.
सदर लाॅकडाऊन परीस्थीतीत राष्ट्रहिताच्या दृष्टीने सरकारने पोलिसांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. पोलीसांना या अधिकाराचा वापर करण्यास आपण भाग पाडू नका. म्हणून नागरिकांनी वैद्यकीय सुविधा, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व्यतिरिक्त कोणत्याच परिस्थितीत घराबाहेर पडू नये. आपल्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे देशातील नागरिकांचे जीवन धोक्यात येईल व कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल असे नागरिकांनी बेजबाबदार वर्तन नये.
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी किंवा काही महत्त्वाच्या अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास त्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. शासनाने घालून दिलेले नियम हे जनतेच्याच हितासाठी आहेत त्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास अशी वेळ येणारच नाही.
पोलीस, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पत्रकार व शासकीय अधिकारी कर्मचारी हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या राष्ट्रीय संकटाचा सामना करण्यासाठी कंबर कसून काम करत आहेत. त्यांचा मान सन्मान करावा, त्यांना सुद्धा कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना कुटुंब सोडून घराबाहेर रस्त्यावर अहोरात्र राहण्याची हौस नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते जनतेच्या हितासाठी आपले राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य बजावत आहेत.
म्हणून आपण शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत आणि काटेकोर पालन करून कायद्याबाबत आदर ठेवला पाहिजे. शासन जे काही निर्णय घेत आहे ते सर्वकाही जनतेच्या हिताचेच आहे. म्हणून सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचा सामना घरात राहून केला पाहिजे. व स्वतः ला व आपल्या कुटुंबाला या विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोना विषाणूच्या विरूद्धची ही लढाई आपण जिंकून त्यावर मात करू शकतो. म्हणून आपल्या व राष्ट्राच्या हितासाठी स्वतः चा जीव धोक्यात घालून अहोरात्र रस्त्यावर उतरून आपले नैतिक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, डाॅक्टर्स आणि पत्रकार यांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. यात शंका नाही. म्हणून त्यांचा आदर ठेवून त्यांना सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
कोणत्याही अफवांना बळी पडू नका, अफवा पसरवू नका. लाॅकडाऊन तथा संचारबंदीचे नियम मोडू नका. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकार यांना सहकार्य करून कोरोना व्हायरसचे आपल्या देशातून कायमचे उच्चाटन करण्यासाठी सरकारला सहकार्य हीच अपेक्षा.