'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज बनलेय डिजीटल पत्रकारितेचे सक्षम माध्यम
माणगांव (प्रतिनिधी) : 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूजमुळे डिजिटल पत्रकारितेचे एक सक्षम माध्यम रायगड जिल्ह्यात प्रस्थापित झाले आहे. गेल्या काही दिवसांत सर्वसामान्य जनतेचे विविधांगी प्रश्न, सामाजिक समस्या, प्रशासकीय गैरकारभाराचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, क्रिडा अशा अनेक विषयांतील जबरदस्त बातम्या अक्षरश: गाजल्याने 'न्युज २४ तास मराठी' रायगड जिल्ह्याचे डिजिटल मुखपत्र बनले आहे.
'न्यूज २४ तास मराठी'ची लोकप्रियता व व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात नवीन प्रतिनिधी नियुक्त करावयाचे आहेत. त्यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज पाठविण्यासाठी (ई-मेल : news24taasmarathi@gmail.com) येथे संपर्क साधावा. खरं तर पत्रकार बनण्यासाठी पत्रकारितेचा कोर्स करावा लागतो का? शिक्षणाची अट असते का? अशा काही शंका अनेकांच्या मनात असतात. परंतु तसे काही नाही. पत्रकारितेची सुरूवात करण्यासाठी लिहीता वाचता येणे महत्वाचे असून लिखाणाचा अनुभव व आपल्या परिसराची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तसेच आपण प्रत्यक्षात जे पाहू ते आपल्याला योग्य शब्दांत/वाक्यांत मांडता येणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमची वेबसाईट www.news24taasmarathi.com येथे पाहू शकता.