पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड येथे भरोसा सेल स्थापन
रायगड (किशोर केणी) :-
राज्यमंत्री, तथा रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड, अलिबाग येथे भरोसा सेलचे उद्घाटन करण्यात आले.
महिलांना, लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना समुपदेशन, कायदेशीर सल्ला, पोलीस संरक्षण, वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा अशा प्रकारची एकत्रितरित्या सुविधा देण्यासाठी भरोसा सेल स्थापन करण्यात आलेले आहे.
भरोसा सेल उद्घाटन प्रसंगी बडी कॉप महिला पोलिसांना सन्मानित करण्यात आले. बडी कॉप कडील चांगली कामगिरी करणाऱ्या अलिबाग पोलीस ठाणे येथील महिला कर्मचारी पोलीस नाईक सोनम कांबळे व महिला पोलीस शिपाई अक्षता बानकर यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.