आमडोशी युवा झुंजार मित्र मंडळाच्या शिवजयंती निमित्त व्याख्याते सुनीलजी बैकर यांच्या व्याख्यानाने ग्रामस्थांसह श्रोते मंत्रमुग्ध.!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : युवा झुंजार मित्र मंडळ आमडोशी यांच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील आमडोशी येथे बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीचे आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
आमडोशी येथील युवा झुंजार मित्र मंडळाच्या वतीने गेली आठ वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे शानदार आयोजन करून या कार्यक्रमातून अनेकविध उपक्रमांचे आयोजन करून लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर्षी या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी १० : ०० वाजता रायगडावरून शिवज्योत आणून भव्य मिरवणूक काढली. सायंकाळी ४:०० वाजता श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते. या नंतर रात्री ८:०० वाजता महाप्रसाद या नंतर आमडोशी शाळेचे मुख्याध्यापक श्री काप गुरूजी, श्री उभारे गुरूजी आणि श्री दळवी गुरूजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रात्री ९:४५ वाजता रायगड जिल्ह्यातील तळा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. सुनील बैकर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम झाला. या व्याख्यानात शिव व्याख्याते सुनील बैकर यांनी आजच्या समाजाला शिव छत्रपतींचे विचार आणि शिव छत्रपतींच्या शिवनीतीची गरज या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. यामध्ये शूर सेनानी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, छत्रपतींची अाग्र्याहून सुटका, शिवरायांची अलौकिक बुद्धिमत्ता, नियोजन, दूरदृष्टी, छत्रपतींचा वैज्ञानिक दृष्टिकोन, गनिमी कावा यांसंदर्भात सखोल आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या नंतर माणगांव तालुक्यातील सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक व कॅसेट फेम संकेतजी कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नव्याने काढलेल्या कॅसेट मधील "जाणता राजा शिवाजी माझा" हे सुंदर गीत गायन केले. या नंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि घुलघुले भावकी यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमासाठी आमडोशी शाळेचे मुख्याध्यापक श्री काप गुरूजी, श्री उभारे गुरूजी, श्री दळवी गुरूजी, पत्रकार विश्वास गायकवाड, महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार सन्मानित शाहीर मधुकर बुवा यादव, शाहीर प्रकाश बुवा पांजणे, शाहीर सखाराम घुलघुले, शाहीर दिपक घुलघुले, ढोलकी वादक अशोक मोहिते, सुधाकर मोरे, मंगेश घुलघुले आणि भजनी मंडळ शाहीर राजाराम जाधव, शाहीर नथुराम साखरे, शाहीर बाबुराव नास्कर आदींची उपस्थिती लाभली होती. मंडळाच्या वतीने सर्व उपस्थितांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमडोशी युवा झुंजार मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री राजेश घुलघुले, अध्यक्ष शशिकांत घुलघुले, उपाध्यक्ष राजेंद्र घुलघुले, उपाध्यक्ष महेंद्र घुलघुले, खजिनदार निलेश घुलघुले, उप खजिनदार ज्ञानेश्वर घुलघुले, सेक्रेटरी सुशांत घुलघुले, उप सेक्रेटरी रुपेश घुलघुले, हिशोब तपासणीस गणेश घुलघुले, सल्लागार मिथुन घुलघुले, उप सल्लागार राजेश घुलघुले आणि आमडोशी ग्रामस्थ मंडळ, घुलघुले भावकी, सोहम ट्रांसपोर्टचे सुनील शिगवण यांनी प्रचंड मेहनत घेतली. सदर कार्यक्रमास असंख्य रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभली होती.