ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
माणगांवकरांनी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यूचे पालन करून अत्यावश्यक सेवार्थी, आरोग्य सेवकांच्या प्रती घराच्या खिडक्या व गच्चीतून टाळ्या, थाळ्या, वाजवून केली कृतज्ञता व्यक्त! 


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण जगात थैमान घालणार्या महाभयंकर कोरोना व्हायरस या विषाणूचा भारतातील संसर्ग रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक २२ मार्च २०२० रोजी सकाळी साडेसात ते रात्री नऊ या कालावधीत देशातील सर्व जनतेला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्या नुसार महाराष्ट्र राज्यासह देशातील सर्व जनतेने रविवारी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन केले. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील संपूर्ण माणगांव तालुक्यासह ग्रामीण भागातील सर्व जनतेने रविवारी शासन निर्धारित वेळेत जनता कर्फ्यूचे पालन करत रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आपापल्या घराच्या खिडकीत, इमारतीच्या गच्चीवर ठराविक अंतर ठेवून उभे राहून टाळ्या, थाळ्या, शंखनाद आणि घंटानाद करून कोवीड १९ तथा कोरोना व्हायरस या विषाणू विरूध्दच्या लढाईत देशातील जनतेच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनहितार्थ अहोरात्र आरोग्य सेवा तसेच सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा प्रदान करणार्या सर्व सेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.


चीन मधील हुआन शहरात उगम पावलेल्या कोरोना व्हायरस या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू युक्त रोगाचा प्रादुर्भाव चीन मधील हुआन शहरासह संपूर्ण जगात झाला आणि कोरोना व्हायरस या महाभयंकर संसर्गजन्य रोगाचा संसर्ग होवून संपूर्ण जगातील सर्व देशातील अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसचा भारतातील प्रादुर्भाव तथा संक्रमण रोखण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना जनता कर्फ्यूचे जाहीर आवाहन केले होते. अर्थात जनतेने जनतेच्या हितासाठी स्वयंप्रेरणेने केलेली संचारबंदी तथा जमावबंदी. या जमावबंदीचे आणि जनता कर्फ्यूचे देशातील, राज्यातील आणि सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संवेदनशील पार्श्वभूमीवर संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील आणि तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागातील सर्व जनतेने जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


त्यामुळे माणगांव तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, रस्ते आणि परिवहन सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि सर्व रहदारीच्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी शासन निर्धारित वेळेचे तंतोतंत पालन करून सायंकाळी पाच साडेपाच वाजता माणगांव तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील जनतेने आपापल्या घरांच्या इमारतींच्या खिडकीत, गच्चीवर उभे राहून या कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस, डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आणि सर्व प्रकारच्या सेवकांच्या अभिमानास्पद कामगिरी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या, थाळ्या, शंखनाद आणि घंटानाद करून कृतज्ञता व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog