अद्यावत निर्जंतुकीकरण फवारणी यंत्राचा माणगांव नगरपंचायतीमध्ये प्रथमच समावेश 



माणगांव (प्रतिनिधी) :
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव आणि स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगले काम सुरु असून नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी विशेषतः स्वच्छता सेवक, पाणी पुरवठा कर्मचारी योग्य खबरदारी घेत आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. नुकतेच शहराचे निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून नगरपंचायतीमध्ये नवीन अद्यावत कीटकनाशक औषधे फवारणी यंत्रांचा समावेश झाला असून सदर यंत्रांमध्ये एका वेळेस ६०० लिटर किटकनाशक औषधांची फवारणी करता येते. नगरपंचायत स्वच्छता सभापती रत्नाकर उभारे तसेच उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी शहर स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून एक  चांगले पाऊल उचलल्याची  माणगांवकरांची भावना व्यक्त होत आहे.


माणगांव नगरपंचायत हद्दीत निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र कार्यान्वित करण्यांत येणार आहे. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच अन्य प्रादूर्भाव रोखण्यासाठी फवारणी सुरु केली जाणार आहे. तसेच दररोज कचरा संकलनाचे कामही व्यवस्थित होत आहे. नुकतेच नवीन स्वच्छता घंटागाड्या उपलब्ध झालेल्या आहेत अशी माहीती माणगांव नगरीच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी यासंदर्भात बोलताना दिली असून नगरपंचायत नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेत आहे. वेळोवेळी नागरिकांना योग्य त्या सूचना देत असून कोणीही गर्दी करु नये, घरीच राहावे शासन यंत्रणेला सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे.

Popular posts from this blog