कोरोना प्रतिबंधासाठी विळे विभागातील ग्रामीण यंत्रणा सज्ज  



माणगांव (प्रतिनिधी) :
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशाचे पंतप्रधान महोदयांनी 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी तर संचारबंदी कायम लागू ठेवली आहे. याचवेळी मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातून चाकरमान्यांचा परतीकडे म्हणजेच मूळगावी ग्रामीण भागाकडे परतण्याचा कल वाढलेला दिसून येत आहे. मुळात मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये कोरोना संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण यासाठी खबरदारी म्हणून माणगांव तालुक्यातील विळे विभागातील ग्रामीण यंत्रणा व ग्रामस्थ सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.


'न्यूज २४ तास मराठी'च्या संपूर्ण टिम ने विळे विभागातील तीन ग्रामपंचयातीना भेटी दिल्या. त्यामध्ये विळे  ग्रामपंचायत, सणसवाडी ग्रामपंचायत व विळे वरचीवाडी ग्रामपंचायत येथील सरपंचांची भेट घेऊन, तसेच विळे गावातील सुप्रसिद्ध डॉ. नितिन मोदी यांच्या क्लिनिकला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा केली. विशेष मध्ये डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटचे स्वागत मोदी क्लिनिक च्या परीचारिकांकडून हातावर सैनिटायझर देऊन केले जात आहे. तर प्रत्येक पेशंटला नाकावर मास्क किंवा रुमाल लावण्याची सूचना देखील डॉ. मोदी यांच्याकडून होत असल्याचे पहायला मिळाले. पण कोरोना प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे किट ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली.


विळे ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन मोहीते यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आम्ही तालुका व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करत आहोत व स्वत: जातीने लक्ष केंद्रीत केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच


सणसवाडी ग्रामपंचायतीच्या संरपंच सौ. सुमिता नलावडे यांनी देखील आम्ही गावामध्ये गावाबाहेरील अनोळखी व्यक्ती व यांना गावात प्रवेश बंद केल्याचे सांगितले. तसेच गावातुन अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर जाऊ नये असे वारंवार प्रत्येक घरोघरी जाऊन सांगत असल्याची माहीती दिली व दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचानी मार्च महीन्यापुर्वी गावामध्ये मुंबई, पुणे, सुरत, बडोदा येथून आलेल्या चाकरमान्यांना गावात इतरत्र न फिरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घरातच राहण्याची समजदेखील दिली आहे. तसेच अद्यापही बाहेर असणाऱ्या चाकरमान्यांना संपर्क करुन आपण गावात येऊ नये, आहात तिथेच काळजी घेऊन रहा असे सांगितले आहे. अशा प्रकारची व्युहरचना कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी विळे गावचे सरपंच श्री. मोहीते व सणसवाडी ग्रामपंचतीच्या सरपंच सौ. सुमिता नलावडे यांच्याकडुन केली गेली आहे व गावपातऴीवर त्याची 100% अंमलबजावणी देखील होत आहे. माणगांव तालुक्यातील या ग्रामचायंतीनी केलेली ही तयारी कौतुकास्पद आहे. 

Popular posts from this blog