ब्रेकिंग न्यूज
🚨 पुणे पोलिसांचा बुधवार पेठेत मोठा दणका! अल्पवयीन मुलीची सुटका करत १५ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात🚨
कोरोनामुळे यंदा कलाकारांवर उपासमारीची वेळ, शासनाने आर्थिक पॅकेज जाहिर करावे !


माणगांव (प्रतिनिधी) :
संपूर्ण जगतात कोरोना व्हायरसने देशासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून त्याचा तीव्र आर्थिक फटका ज्यांचे हातावर पोट आहे अशा घटकाला बसला असून प्रामुख्याने सांस्कृतिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. कलाकारांचे मार्च, एप्रिल, मे हे महिने हंगामाचे असतात. या महिन्यात कार्यक्रम करून पुढील वर्षभराची आर्थिक तरतूद उपजीविकेसाठी ते करत असतात. कोरोनामुळे देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे या घटकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. उदरनिर्वाहाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या कलाकारांना कला सादर केल्याशिवाय मानधन मिळत नाही आणि त्याशिवाय त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू शकत नाही. कलाकार संवेदनशील आहे. मनातील दुःख बाजूला ठेवून ते रसिकांचे मनोरंजन करत असतात. येईल त्या संकटाला सामोरे जात असतात. परंतु कोणत्याही कलेला राजाश्रय मिळाल्या शिवाय लोकाश्रय मिळत नाही हे आपण जाणता. सर्व कलाकार सरकारकडे या गंभीर स्थितीत आपण मदतीचा हात द्याल आणि त्यांना साथ द्याल या आशेने आपल्या कडे पाहत आहेत. तरी समस्त कलाकारांच्या वतीने आपल्याला या निवेदनातून विनंती करण्यात येते की या कोरोनाच्या धर्तीवर लॉकडाऊन काळात आपण कलाकारांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे व त्यांचासह कुटूंबियांना दिलासा द्यावा. निवेदन चित्रपट व सांस्कृतिक, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस श्री. वंदन नगरकर आणि कोकण विभाग अध्यक्ष डॉ. अजय आत्माराम मोरे यांनी शासनाकडे केली आहे.

Popular posts from this blog