फेसबुकवर चाईल्ड पॉर्न अपलोड, कोल्हापुरात दोघांना अटक  


कोल्हापूर :- फेसबुकद्वारे लहान मुलांचे लैंगिक छायाचित्र आणि पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याच्या घटनांमध्ये वाढ होतं आहे. कोल्हापुरात नुकतंच अशा दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांकडून मोबाईल सिमकार्ड असं साहित्य देखील जप्त करण्यात आलं. हे प्रकार करणारे आणखी काही संशयित सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत.

सोशल मीडियात चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रकार आता ग्रामीण भागात देखील वाढत आहेत. लहान मुलांचे अश्लील छायाचित्र, तसेच व्हिडीओ काही जणांकडून सोशल मीडियावर अपलोड केली जात आहेत. यातून पैसा मिळवण्याचा अशा समाजकंठकांचा प्रयत्न आहे. मात्र, फेसबुकने आता अशा लोकांवर नजर ठेवायला सुरवात केली आहे.

फेसबुक अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करण्याची माहिती पोलिसांना देत आहे. दर महिन्याला असा एक अहवाल सायबर विभागाच्या पोलीस महासंचालकांना मिळतो. त्यानुसार, राज्यभरात कारवाया सुरु झाल्या आहेत. असेच, दोन प्रकार कोल्हापुरात देखील समोर आले आहेत.

कोल्हापुरात एका वेबसाईटचा वापर करुन हे पॉर्न व्हिडीओ अपलोड केले जात होते. फेसबुकने दिलेल्या अहवालानंतर याप्रकरणी अमोल डिसुजा आणि विशाल आत्याळकर नावाच्या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली.

फेसबुकन दिलेल्या अहवालानुसार, राज्‍यभरात अशा १६०० प्रकरणाची चौकशी सायबर पोलीस करत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २५ प्रकरणांचा समावेश आहे. तर, चार प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. पुण्यात अशा ७०० गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत. 

Popular posts from this blog