कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाड चवदार तळे येथील २० मार्चचे सर्व कार्यक्रम रद्द 

भारतीय बौद्ध महासभेसह सर्व सामाजिक संघटनांचे जनतेला याठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन 


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न  महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे या तळ्यातील निसर्गदत्त पाणी तमाम बहुजन समाजाला प्यायला मिळावे व त्याना त्यांचे मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी या ठिकाणी पहिला समता संगर केला होता. या ऐतिहासिक चवदार तळे क्रांती दिनांला दि २० मार्च २०२० रोजी ९४ वर्षे पूर्ण होत अाहेत. परंतू सद्या संपूर्ण जगभरात व भारत देशात सध्या पसरलेल्या कोरोना या साथीच्या महा भयंकर आजारा मुले महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले अाहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील माणगांव येथील २१ व २२ मार्च आयोजीत केलेली माणगांव परिषद शताब्दी महोत्सव हा कार्यक्रम देखील जिल्हा प्रशासनाने पुढे ढकलण्याच्या सुचना केल्याने. सदर आदेशाचे पालन करू भारतीय बौध्द महासभा या संस्थेच्या वतीने देखील महाड चवदार तळे येथे श्रामणेर शिबिर या कार्यक्रमाचा समारोप तसेच समता सैनिक दलातर्फे विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकराना व क्रांती स्तंभाला मोठी मानवंदना तसेच जाहिर सभा असे मोठे कार्यक्रम दरवर्षी होत आसतात हे कार्यक्रम या वर्षी कोरोना या साथीच्या आजारामुळे भारतीय बौध्द महा सभेच्या महाराष्ट्र कार्यकारणीने आणि तत्सम धार्मिक व सामाजिक संघटनांनी रद्द केल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे देशासह राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी गर्दी न करण्याचे सर्व जनतेला नम्र पणे आवाहन केले आहे. तरी सर्व जनतेने याचे पालन करावे.

गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून आयोजीत केला जात आसलेल्या २० मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिना निमित्ताने विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी देशभरातून व महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने बहुजन व भिम सैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात  त्यांच्या  जीवितास कोरोना या साथीच्या आजाराचा धोका होऊ नये यामुळे तातडीने शुक्रवार दि १३ मार्च २०२० रोजी डाॅ. आंबेडकर भवन दादर मुंबई येथे भिमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौध्दमहासभा व राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल याच्या अध्यक्षते खाली मिटींग घेण्यात आली. या मिटिंग च्या माध्यमातून विशेष परिपत्रक काढून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जनतेने चवदार तळे महाड या ठिकाणी गर्दी करू नये असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील क्रांती भूमी महाड चवदर तळे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी २० मार्च १९२७ रोजी पहीली क्रांती केली. या दिनांनिमित जगभरातून भारत देशातुन महाराष्ट्रातून असंख्य भिम अनुयायी क्रांती भूमी महाड चवदार तळे येथे येत असतात. महाड चवदार तळे २० मार्च रोजी महाड चवदार तळे येथे भिमसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी  पहावयास मिळत असते.   

यावर्षी देशविदेशात व महाराष्ट्रात सध्या कोरोनाने थैमान घातले असून व महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या आवाहनानुसार राज्यात निर्माण झालेल्या कोरोनामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर या मोहत्सवात सामिल होणाऱ्या लाखो जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भारतीय बौध्दमहासभा या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भिमराव आंबेडकर साहेब आणि त्यांच्या कार्यकारिणी मंडळाने कोल्हापूर माणगांव येथील परिषद महोत्सव कार्यक्रम पुढे ढकलण्यात अाला आहे.

रायगड जिल्ह्यातील क्रांती भूमी महाड २० मार्च चवदार तळे ९४ वा वर्धापण दिन हा कार्यक्रम रद्द केल्याचे प्रसिध्दी पत्रक भारतीय बौध्द महासभा महाराष्ट्रचे अध्यक्ष यु जी बोराडे, यांच्यासह अनेक सामाजिक व धार्मिक संघटनांनी पत्रक काढून सर्व आंबेडकरी जनतेला महाड येथे गर्दी न करण्याचे नम्र आवाहन केले आहे.

Popular posts from this blog