दिघी ग्रामपंचायत महिला उपसरपंचांची कौतुकास्पद कामगिरी
स्वतः गावात सैनेटरायझेशन करुन जनजागृती
रायगड (किरण बाथम) : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सर्वत्र जनजागृती होत आहे. दिघी ग्रामपंचायत हद्दीत उपसरपंच गीता वाढई-झेवियर यांनी स्वतः गावात सैनेटरायझेशन करुन जनजागृती केली व एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दिघी गावात दिघी पोर्ट आहे. त्यामुळे याठिकाणी सावधगीरी महत्त्वाची आहे. खूप कामगार बाहेरून आलेले आहेत. श्रीवर्धन, हरेश्वर, मुरुड-जंजिराकडे जाणारे पर्यटक पर्यटनस्थळ असल्याने दिघी मार्गाने जातात. उपसरपंच गीता वाढई- झेवियर यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः या मोहिमेत सहभाग घेतला.