सखी ग्रुप माणगांव आयोजित मिस अँड मिसेस स्पर्धेमध्ये मिसेस माणगाव शुभ्रा घर्वे,  मिस माणगांव नम्रता जाधव



माणगांव (उत्तम तांबे) : सखी ग्रुप माणगांवच्या विद्यमाने १४ मार्च २० रोजी कुणबी भवन माणगाव येथे मिस अँड मिसेस माणगाव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मिसेस माणगांव शुभ्रा घर्वे तर मिस माणगांव नम्रता जाधव विजेत्या झाल्या. या विजेत्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह व हिरेजडीत मुकूट बहाल करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रम शुभांगी वैभव साबळे, अंकिता आभिजीत साबळे, निलीमा काप यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजीतबद्ध केला होता. दैनंदिन संसारीक जीवन जगत असताना सर्वसामान्य महिलांना एक नवीन व्यासपीठ मिळावे, एक वेगळ्या अनुभवातून समाधान व आनंद त्यांना मिळावा तसेच या विशेष स्पर्धेमध्ये संधी प्राप्त व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मनोगत सखी ग्रुपच्या सौ. शुभांगी साबळे यांनी यावेळी व्यक्त केले.


सखी ग्रुपचे तिसऱ्या वर्षात पदार्पण असून महिला दिनाचे औचित्य साधून मिस अँड मिसेस माणगांव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे सौ. अंकीता साबळे यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये २५ महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये मिसेस माणगांव शुभ्रा घर्वे, बेस्ट फोटोजनीक मंजिरी अंधेरे, बेस्ट कॅटवॉक बिजाक्षी रॉय, बेस्ट हेअर स्टाईल आश्विनी समेळ, बेस्ट आऊटफिट श्वेता लोकेश तर मिस माणगांव नम्रता जाधव, बेस्ट हेअर स्टाईल केशर वाढवळ, बेस्ट कॅटवॉक आकांक्षा शिंदे, बेस्ट आऊटफिट- मानसी पवार, बेस्ट फोटोजनीक दुर्गा अंबुर्ले या विजेत्या ठरल्या. विजेत्या स्पर्धक मिसेस माणगांव सौ.शुभ्रा घर्वे यांच्या निवासस्थानी जाऊन राजिव साबळे (शिवसेना युवा नेते), ग्रामपंचायत सदस्य रणधीर कनोजे, माणगांव प्रेस क्लब अध्यक्ष उत्तम तांबे या मान्यवरांनी सौ. घर्वे यांचे विशेष अभिनंदन केले.


सदर कार्यक्रमाला योगिता चव्हाण (नगराध्यक्षा), शुभांगी जाधव (माजी उपनगराध्यक्ष), निलीमा मेथा (नगरसेविका), श्रद्धा भिडे (लेखीका), ज्योती बुटाला (समाजसेविका) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.


मिस अँड मिसेस माणगांव या स्पर्धेसाठी शिल्पा साबळे, शुभांगी जाधव, शर्मिला सुर्वे, प्राची झेमसे, चेतना गुजर, बिजाक्षी रॉय, स्मिता बोंबले, डिंपल जैन, रूपाली बने, आराध्या पार्लर, कोरियोग्राफर राजेश यादव, फोटोग्राफर हर्षदा गोटेकर यांचे विशेष सहकार्य लाभले .

Popular posts from this blog