येथे मिळत आहेत जिवंत कोंबड्या फक्त १० रुपये प्रति किलोने!


अमरावती : गेल्या एक ते दीड महिन्यापासून चीनमध्ये आलेल्या कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा आता जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसार झालेला आहे. कोंबडीमुळे कोरोना व्हायरस पसरतो, या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या भीतीने चिकनची मागणी घटल्याने भावही गडगडले आहेत. अमरावती जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक १० रुपये प्रति किलो जिवंत कोंबडी विकताना दिसत आहेत. १० रुपये प्रति किलो जिवंत कोंबडी, ८० रुपये प्रति किलो चिकन या पाट्या लागल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या अफवेने पोल्ट्री व्यवसायिकांना रडवलं आहे. मागील अनेक दिवसांपासून सोशल माध्यमावर कोंबडीमुळेच कोरोना व्हायरल होतो, अशा आशयाचे मॅसेज फिरत आहे आणि त्याचाच धसका हा चिकन खाणाऱ्या नागरिकांनी घेतलाय.

साधारणतः ८० ते ९० रुपये किलोने विकल्या जाणारी जिवंत बॉयलर कोंबड्या चक्क १० रुपये किलोने विकण्याची वेळ या व्यवसायिकांवर आली आहे. या व्यवसायात लाखोंची उलाढाल व्यावसायिकानी केली. परंतु कोरोना इफेक्टमुळे मात्र कोंबडीला मागणी नसल्याने लाखोंच्या कोंबड्या विक्रीआभावी पडून आहे.

Popular posts from this blog