माणगांव उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिलीप जाधव विराजमान



माणगांव (प्रतिनिधी) :-
माणगांव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता अस्तित्वात आहे. मागील काही काळात राजकीय स्थित्यंतरे घडली. मात्र कुठल्याही राजकीय पक्षाला माणगांव नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता फार काऴासाठी हलविण्यात यश आले नाही. याचे कारण म्हणजे रायगडचे दस्तुरखुद्द खासदार सुनिलजी तटकरे यांनी तयार केलेले माणगांव शहरातील आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते..!


माणगांव नगरपंचायतीची निवडणुक मुदत अवघी १४-१५ महीने बाकी राहीली असून माजी उपनगराध्यक्षा सौ. शुभांगी जाधव यांनी घरवापसी करुन पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अंतिम टप्प्यातील उपनगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्र. २ चे नगरसेवक व खासदार सुनिलजी तटकरे आणि माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांचे निकटवर्तीय समजले जाणारे  दिलिप (बबडी) जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माणगांवातील जनसामान्यांचा हक्काचा माणूस सर्वसामान्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणारे बबडीशेठ अशी यांची अोळख आहे. अगदी सर्वसामान्य घरातील जन्म असलेल्या जाधवांनी प्रत्येक प्रसंगावर मात करत कुणाला भाऊ कुणाला दादा असे करत माणसे जोडली व समाजसेवेचे व्रत जोपासले. म्हणूनच त्यांना जनतेने माणगांवचे पहिले नगरसेवक म्हणून मान दिला. एक सर्वसामान्य विशेष कार्यकारी अधिकारी ते माणगांव नगरीचे उपनगराध्यक्ष अशा प्रवासात आपल्या कामाची चुणूक दाखवत नगर पंचायतीचे अारोग्य, शिक्षण, स्वच्छता व दिवाबत्ती समितीचे सभापतीपदे पदे देखील भुषविली.

या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माणगांवच्या तहसिलदार प्रियांका आयरे यांनी काम पाहिले व मुख्याधिकारी राहुल इंगळे हे उपस्थित होते. तसेच अभिनंदनाकरिता पंचायत समिती माजी सभापती प्रभाकर उभारे व संगिता बक्कम तसेच माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व सर्व नगरसेवक, उद्योजक सुधाकरजी शिपुरकर, माजी जि. प. सदस्य द्यानदेव पवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन गावणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगांव कार्याध्यक्ष शशिकांत मोहिते तसेच विद्यमान उपनगराध्यक्षांच्या मतदारसंघातून म्हणजेच प्रभाग क्रं 2 मधुन दत्तनगर पूर्व रहिवासी मंडळाचे अध्यक्ष जयंत शिंदे ,नवनाथ गावडे, उमेश बडे, शैलेश बामणे, क्रांतीनगरमधून बळीराम मोरे  व असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
उपनगराध्यक्ष म्हणुन दिलिप (बबडी) जाधव यांची घोषणा झाल्यानंतर माणगांव नगरपंचायत कार्यालयापासून मिरवणुक काढण्यात आली. कोकणी स्पेशल खालुबाजा, फटाक्यांच्या अातषबाजीत व लेझिम न्रुत्याच्या ठेक्यात ही मिरवणूक मुंबई-गोवा हायवे, निजामपुर रोड ते उपनगराध्यक्षांचे निवासस्थान उपकार सदन विरेश्वरनगर इथपर्यंत काढण्यात आली.

Popular posts from this blog