माणगांव ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतर्फे नगरपंचायतीला 'फॉग मशीन' प्रदान



माणगांव (प्रतिनिधी) :
माणगांव शहरातील नामांकित पतसंस्था माणगांव ग्रामीण बिगरशेती पतसंस्था माणगांव यांच्याकडून दि. ३१ मार्च रोजी माणगांव नगरपंचायतीस फवारणी (फॉग) मशीन प्रदान करण्यात आले. सध्या देशात आणि जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी किंबहुना साथीचे रोग हिंवताप, डेंग्यू यांसारख्या आजारांपासुन नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी हे फॉग मशीन माणगांव नगरपंचायतीस प्रदान करण्यात आले.


माणगांव ग्रामीण बिगरशेती पतसंस्था ही माणगांव शहरातील अग्रगण्य पतसंस्था आहे. ही पतसंस्था माणगांव शहरात अनेक समाजोपयोगी लोकाभिमुख प्रकल्प आणि योजना राबवत असते. जेष्ठ नागरिंकासाठी अधिक ठेवींवरील अधिक व्याजदर योजना, सर्वसामान्यांसाठी अल्प व्याजदरात व्यवसाय कर्ज, विजजबिल भरणा केंद्र, महिलांसाठी वार्षिक हळदीकुंकू समारंभ असे अनेक उपक्रम सदर पतसंस्था राबवत असते. सामाजिक कर्तव्याची जाणीव म्हणून व कोरोना संसर्गासोबत सामाजिक स्वच्छतेची जाणीव तसेच माणगांवमधील नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून हे (फाॉग) मशीन नगरपंचायतीस प्रदान करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे हे फॉग मशीन माणगांव नगर पंचायतीचे कर्मचारी श्री. साळवी यांच्या हाती देऊन पतंसंस्थेचे चेअरमन आणि माणगांव नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांनी नगरपंचायतीस प्रदान केले. या कार्यक्रमास माणगांवच्या प्रथम नागरिक तथा माणगांवच्या नगराध्यक्षा सौ. योगिता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप (बबडी) जाधव, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक रत्नाकर उभारे, सभापती व नगरसेवक जयंत बोडेरे, माणगांव ग्रामीण पतसंस्थेचे संचालक दिलीप अंबुर्ले, शाखा व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड, कर्मचारी श्री. चिपळूणकर, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस माणगांव शहराध्यक्ष महामुद धुंदवारे व सर्व माणगांव नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. माणगांव ग्रामीण बिगरशेती पतंसंस्थेच्या या समाजाभिमुख कार्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Popular posts from this blog