महाड तालुका स्तरीय नृत्य स्पर्धेत केंबुर्ली शाळेला प्रथम क्रमांक


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) :
जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत महाड तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे नृत्य, नाट्य व क्रीडा स्पर्धा बालसंस्कार विद्यालय कोकरे ता. महाड या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामधील पारंपरिक नृत्य स्पर्धेत केंबुर्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याविष्कार सादर करून रसिकांची मने जिंकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सदर स्पर्धेचे परीक्षण प्रज्ञा कांबळे मॅडम नवयुग, नातेकर सर गुरुकुल व म्हात्रे सर बी.आर.सी. महाड यांनी केले. केंबुर्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरावरुन बीट स्तरावर व त्यानंतर तालुका स्तरावर यशस्वी कामगिरी केल्याबद्दल महाड तालुका पंचायत समिती सभापती सौ. गांगण मॅडम, उपसभापती श्री. मांडवकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. खेडेकर, गटशिक्षण अधिकारी सौ. यादव मॅडम, वरिष्ठ विस्तार अधिकारी सौ. चांदोरकर मॅडम, केंद्रप्रमुख सौ. विरकर मॅडम यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक किशोर शिर्के सर, सौ. कदम मॅडम, सौ. करंबे मॅडम, सौ. जोशी मॅडम यांचे जाहीर कौतुक व अभिनंदन केले आहे. सदर बातमीमुळे केंबुर्ली ग्रामस्थांनी, व्यवस्थापन समितीने, करंजखोल केंद्रातील सर्व शिक्षकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Popular posts from this blog