खासदार सुनिल तटकरे यांनी घेतली पत्रकारांच्या तक्रारीची दखल, पोस्को स्टिल कंपनीचे काम बंद
रायगड (किरण बाथम) :
संपुर्ण जग आणि भारत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आऴा घालत शासन आणि प्रशासन समन्वयाने नव-नवीन अध्यादेश काढून त्यांची अंंमलबजावणी नागरिकांच्या भल्यासाठी करत आहे. मात्र माणगांव तालुक्यातील विऴे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र स्टील या कोरीयन कंपनीचा कारभारच अजब..!
जनता कर्फ्यु 22 मार्च रोजी असताना देखील ही कंपनी बंद नव्हती. त्या दिवशी पहाटे 4 वाजता बसेस ने कामगारांना बोलावून रात्री 11 नंतर सोडण्यात आले. जे कामगार कोरोना संसर्गाच्या भितीने घरी राहतात त्यांना कामावरुन कमी करण्याची भिती असते. एखादा कामगार रजा घेऊन घरी राहिल्यास मनेजमेंट कडून त्या कामगाराचे गुगल लोकेशन मागितले जात आहे. सदर कंपनीमध्ये कॅन्टीन व्यवस्था असुन तिथे 70 मदतनीस व वर्कर मिऴुन सुमारे 100 कामगार काम करतात.
आमचे प्रतिनिधी व इतर चॅनेल चे प्रतिनिधी पोस्को कंपनीजवऴ पोहचले असता तेथील सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून व्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकारी जागेवर नाहीत अशा प्रकारची माहीती मिऴाली. खुप प्रयत्नानंतर मॅनेजमेंटशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली की, आम्ही 50% कामगार कपात करुन कंपनी चालू ठेवली आहे. संपुर्ण प्लँट बंद ठेवता येत नाहीत.
परंतु नागरिकांचे म्हणणे असे आहे की, महिन्यातून दोन वेळा कंपनीचे शट डाऊन असते त्यावेळी कसे चालते? मग ह्या जागतिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी कंपनी बंद का नाही? असा सवाल देखील नागरिकांकडून केला जात आहे.
सदर कंपनीचे मुख्य कार्यालय हे पुणे येथे आहे आणि मालवाहतुक देखील मुंबईसारख्या शहरात होत असते या शहरांमध्ये संसर्गित रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुऴे माणगांव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आमचे कार्यकारी संपादक किरण बाथम यांनी आणून दिली. खासदार तटकरे यांनी सदर बाबतीत राज्य शासनाशी संवाद साधून कंपनीचे कामकाज त्वरित बंद करण्यास भाग पाडले.