ओमकार भजनी मंडळाचा शिमगोत्सव हर्षोउल्हासात साजरा   



माणगांव (उत्तम तांबे) :
माणगाव खांदाड गावामधील एकतेचे दर्शन घडविणारे मंडळ म्हणजे ओमकार भजनी मंडळ. या मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे सोमवार दि.९ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा दिनी मारूती मंदिराच्या पटांगणात शिमगोत्सव अर्थात, होळी उत्सव मोठया हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. कोकणातील शिमगा हा एक मोठा पारंपारिक सण आहे. हिन्दु धर्मात या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे.


सांस्कृतिक परंपराचे माहेरघर असलेल्या कोकणात सर्वत्र वेगवेगळे उत्सव आणि परंपरा आजही मोठया मनोभावे जपल्पा जात आहेत. ९ मार्च फाल्गुन पौर्णिमेला होळी आणि १० मार्च रोजी धुळी वंदन असल्याने चाकरमन्यांची  गावाकडे येण्यासाठी मोठी लगबग चालू होती. शिमगोत्सव होळी सणाला कोकणात मोठ महत्त्व असल्यामुळे एक वेगळाच उत्साह पहायला मिळाला.


ही संस्कृती ओमकार भजनी मंडळाने वर्षानिवर्ष जपली आहे. ओमकार भजनी मंडळाचे अध्यक्ष दिलीप यादव, सेक्रेटरी प्रसाद शिंदे तसेच ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा सावळे, नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व सभासद एकत्र येऊन, अंगमेहनत घेऊन मोठया उत्साहाने गेले नऊ दिवस होळी उत्सव आनंदाने साजरा करीत आहेत. चोरहांडकुळेच्या दिवशी सुकलेली लाकडे, सावरीचे छोटे झाड (पिलू), पालापाचोळा, सुका कचरा व गवत आणून होळी रचण्यात आली. रात्री या होळीची, होलीकादेवीची आराधना गारहान घालून होळीला खण नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवद्य दाखऊन  मनोभावे पूजा करण्यात आली.


यावेळी पूजेसाठी महिलांची रिघ लागली होती. होलीका मातेचे दर्शन घेण्यासाठी, होळीत नारळ राखण्यासाठी ग्रामस्थ मोठया संखेने जमा झाले होते. "ह्यार पालकीत कोण देव बसं, सोन्याचं नांन मला रुप्याचं ठसं" . अशी आराधना करीत होळीला प्रदक्षणा घालून विधीपूर्वक पूजा करून होम पेटऊन ग्रामस्थांनी होमउत्सव आनंदात साजरा केला. होळी उत्सवासाठी वापरण्यात येणारे कलर, रंग, चायना लायटींग अशा मेडईनचायना विविध वस्तूंचे या होळीमध्ये दहन करण्यात आले. या उत्सवादरम्यान ओमकार भजनी मंडळाच्या पडत्या काळात दिपकभाई साबळे यांचे मोठे योगदान लाभले होते. त्यांच्या सामाजिक बांधीलकीच्या कर्तव्या दक्षा बद्दल त्यांचा या होम उत्सव प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.


हे होलिका माते आमच्या ओमकार भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे निराशा, दारिद्रय, आळस तूझ्या आग्निमध्ये दहन कर आणि त्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो असे पुजेच्यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलीप यादव, तसेच सोनभैरव ग्रामस्थ मंडळाचे प्र . मार्गदर्शक ज्ञानदेव पोवार यांनी गाऱ्हाणं घालून आराधना केली. या होळी उत्सवाला खांदाडकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog