🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
जागतिक महिला दिनानिमित्त राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना साडी व गुलाब पुष्प वाटप 


पनवेल (प्रतिनिधी) :  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्यातील सर्व स्तरातील व महिलांना नेहमी सन्मानाची वागणूक देत असत त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्याकडून नेहमीच महाराजांना अभिप्रेत असे कार्य केले जात आहे.


यावेळी महिला दिनानिमित्त देखील प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, मुंबई संघटक चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेकडून पनवेलमधील कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या) व भंगार व्यवसाय करणाऱ्या महिलांना राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनानेनुसार साडी व गुलाबाचे फुल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.


यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिनी भलेमोठे कार्यक्रम लाखो रुपये खर्च करून कार्यक्रम होतात यामध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडा, न्याय, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील सर्वच महिलांचा सत्कार होत असतो मात्र कचरा विघटन करणाऱ्या (वेचणाऱ्या), भंगार व्यवसाय करणाऱ्या, धुणी भांडी व घरकाम करणाऱ्या अशा महिलांचा सन्मान फार कमी होत असतो त्यामुळे आम्ही यावर्षी अशा महिलांचा सत्कार करून त्यांचे देखील समाजात मानाचे स्थान आहे हे निदर्शनास आणून दिले असे मत रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी व्यक्त केले.


यावेळी राजे प्रतिष्ठानकडून महिलांना साडी व गुलाबपुष्प देण्यात आले.  दरम्यान केवल महाडिक यांच्या या कार्यक्रमाचे समस्त महिलावर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमास रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, खारघर महिला अध्यक्षा अॅड. संतोषी चव्हाण, उपाध्यक्षा डॉ. सोनाली कलगुडे, खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, विजय पाबळे, राजू मोरे, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, विजय शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog