सामाजिक कार्यकर्ते राकेश जाधव यांचा वाढदिवस साजरा 


वाढदिवस हा प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला



वावोशी (प्रतिभा शेवाळे) :
वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक वेगवेगळे उपक्रम योजतात. पण जनसेवेसाठीचे ध्येय असणाऱ्यांना आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करावा असे कधीच वाटत नाही. ते नेहमीच समाजसेवेला अनुरूप असेच एखादे निमित्त शोधतात. असाच एक वाढदिवस नुकताच एका ध्येयवेड्या समाजसेवकाचा संपन्न झाला. आपल्याला आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा नाही तर वाढदिवसाचे औचित्य साधून रंजल्या गांजळ्यांची सेवा करण्याची संधी शोधण्याचे काम त्याने शोधले आणि आपल्या वाढदिवसाला नुसत्या शुभेच्छांचा वर्षाव न मिळवता एका आदर्श समाजसेवकाची बिरूदी मिळविली.


गोरठण बुद्रुक गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच राकेश जाधव यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक सेवेची जाणीव असलेले आपले मित्र तथा गोरठण गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष बालचंद्र पाटील, शंकरदादा मानकावले, प्रमोद जाधव, पोलीस पाटील जाधव, ज्येष्ठ नागरिक सुभाष (तात्या) पाटील, संतोष शेवाळे, हनुमंत मोरे यांना सोबत घेऊन परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. आपला वाढदिवस आनंदात साजरा व्हावा म्हणून त्यांनी या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शिवरायांच्या जयंतीदिनी आपला वाढदिवस साजरा करतांना आपणास खूप आनंद होत आहे, असा योगायोग कोणाच्याही नशीबी येत नाही तर त्यातही समाजसेवेचे थोडेफार तरी गुण असावे लागतात याची प्रचिती यानिमित्ताने पहायला मिळाली.


नाही होता आले जरी शिवराय तरी शिवरायांचे विचार, आचार आणि शिकवण जिवंत ठेवण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. ज्या महाराष्ट्राने समता, समाजसेवा, एकरुपता, अखंडता याची शिकवण अखंड देशाला दाखवून दिली त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला याचा अभिमान वाटतो असे सांगत सामाजिक कार्यकर्ते राकेश जाधव यांनी यापुढे आपला वाढदिवस हा गरीब, गरजू या बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी साजरा करणार असून यापुढे वाढदिवस म्हणून साजरा न करता प्रेरणा दिन म्हणूनच साजरा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Popular posts from this blog