आदिवासी समाजातील महिलांसाठी आरोग्य शिबीर
२५० महिलांनी घेतला लाभ
रोहे (समीर बामुगडे) :-
जीवनधारा संस्था वरसगाव-काेलाड व लायन्स क्लब रोहे यांच्या विशेष सहकार्याने जीवनधारा संस्था वरसगाव-कोलाड येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी व चिकीत्सा शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी रोह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हर्षद मेहता, डॉ. संतोष देशमुख, मॅजिक कॉरनर बी.ए.डी. डॉ. निशा खारिवले, संचिता पाटील, डॉ. सायली केणे, गुलाब वाघमारे, गुलाब जाधव, सुवर्णा, सुरेखा, सुप्रीया, कुसुम, विद्या, मनिषा, रेश्मा काेदे, रेश्मा पवार, आरती, सुवर्णा जाधव, सुचिता, अलका व संस्थेचे पदाधिकारी माया ताई, हिराताई व गेसीताई आदी उपस्थित होते.
या शिबिरातंर्गत ३५ वाड्यांतून २५० लाभार्थींनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. यावेळी हाडांमध्ये जीवनसत्त्वांची आढळणारी कमतरता व हाडांचे विकार आदींबाबत, तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. २० लाभार्थींच्या डाेळ्यांत माेतीबिंदू आढळून आल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी अलिबाग येथे पाठविण्यात आले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हर्षद मेहता व उपस्थित राहिलेल्या डॉक्टरांनी जीवनधारा संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षिका यांनी शब्दात व कृतीत व्यक्त केलेल्या पाहुणचारमुळे खूप आनंद झाला असल्याचे व अशाप्रकारचा अनुभव पहिल्यांदाच आला असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरासाठी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यकर्त्या गुलाब वाघमारे यांनी केले, तर सुवर्णा जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.