कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर माणगांव पोलीसांनी ठेवलेल्या सॅनिटाइजर व हॅन्ड वाॅश बेसिन्सच्या अभिनव संकल्पनेचे माणगांवमध्ये सर्वत्र कौतुक ! 


बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीसांनी बसवलेल्या हॅन्ड वाॅश बेसिनमध्ये सॅनिटाइजरने स्वच्छ हात धुतल्यानंतरतच सर्वांना पोलीस ठाण्यात प्रवेश दिला जात आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह आपल्या देशात सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आणि त्याचा संसर्ग टाळण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन आपापल्या परीने आपली प्रशासकीय यंत्रणा कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

सरकारच्या कोरोना मुक्तीच्या या लढाईला जिंकून देण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने जनतेला दिलेल्या सर्व सूचनांचे सर्व जनतेने काटेकोर पणे पालन केले पाहिजे. तरच या महाभयंकर कोरोना व्हायरसचा नायनाट करून ही मानवी अस्तित्वाची लढाई आपण जिंकू शकतो. अन्यथा कोरोना बाधीत हुआन, इटली, जर्मनी, फ्रांस आणि महासत्ताक असलेल्या अमेरिकेच्या पेक्षा आपल्या भारताची अवस्था बिकट व्हायला वेळ लागणार नाही.

देशावरील किंबहुना जगातील  समस्त मानव जाती वरील हे कोरोना व्हायरसचे महाभयंकर विश्वघातकी संकट टाळण्यासाठी सरकारने कोरोना संक्रमण विरोधी लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर  आपल्याला संचारबंदी व स्वच्छता आणि आरोग्यासंबंधी ज्या ज्या महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व आपल्या व पर्यायाने आपल्या राष्ट्राच्या आणि समग्र मानव जातीच्या हितासाठी व बचावासाठी आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याच्या आवारात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आणि पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी माणगांव पोलीस ठाण्याच्या आवारात माणगांव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या हॅन्ड वाॅश बेसिन मध्ये प्रत्येकाला तिथे ठेवलेल्या जंतूनाशक सॅनिटाइजरने स्वच्छ हात धुतल्या नंतरतच प्रवेश दिला जातो. माणगांव पोलीसांच्या या अभिनव संकल्पनेचे माणगांव तालुक्यातील जनतेकडून कौतुक होत आहे.

Popular posts from this blog