माणगांव सखी ग्रुप आयोजित मिसेस आणि मिस फॅशन शो स्पर्धेत नम्रता शंकर जाधव प्रथम
क्रांती नगर रहिवासी मंडळाकडून तिचा जाहीर सत्कार
बोरघर /माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील सखी ग्रुप आयोजित मिसेस आणि मिस फॅशन शो २०२० स्पर्धेत माणगाव शहरातील स्पर्धक नम्रता शंकर जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. नम्रता जाधव या क्रांती नगर माणगांवच्या रहिवासी असून त्यांचे वडील शंकर बापू जाधव हे क्रांती नगर रहिवासी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते असून ते एम एस ई बी गोरेगांव येथे लाईनमेन आहेत. ते नम्रताला सर्व प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहन व पाठिंबा देत असत.
मिसेस आणि मिस फॅशन शो २०२० स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता कुणबी भवन माणगांव येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत माणगांव मधील अनेक अविवाहित आणि विवाहित अर्थात मिस आणि मिसेस यांनी सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांमधून नम्रता शंकर जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्यांचे सर्व स्पर्धक, निरिक्षक, उपस्थित प्रमुख मान्यवर, प्रेक्षक आणि माणगांव शहरातील सर्व संघटना यांच्या कडून नम्रता शंकर जाधव यांचे अभिनंदन आणि स्वागत केले जात अाहे.
माणगांव सखी ग्रुप फॅशन शो या स्पर्धेचे हे ४ थे वर्ष होते. सदर स्पर्धेचे आयोजन सखी ग्रुप ने केले होते. या चुरशीच्या स्पर्धेत नम्रता शंकर जाधव या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्याने क्रांती नगर मित्र मंडळाकडून तिच्या निवास स्थानी जाऊन तीता जाहीर सत्कार केला. या प्रसंगी संपूर्ण क्रांती नगर रहिवासी यांच्या सह क्रांती नगर अध्यक्ष अॅड. पंकज खामगावकर, उपाध्यक्ष शिवश्री भूषण शिसोदे, कार्याध्यक्ष इंद्रनील पाटील, सचिव आदर्श मोरे, खजिनदार शंकर उभारे, सहसचिव राहुल पाटील, मयुर गुरव, नागेश पाटील, योगेश पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.