जनता कर्फ्यु आणि कोरोना प्रतिबंधासाठी माणगांव तालुका नाभिक संघाचा पाठींबा



माणगांव (प्रतिनिधी) : 
सध्या जगात भीषण धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यसरकार आटोकाट प्रयत्नाला लागले आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनाला तशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि त्या आदेशांची अंमलबजावणी माणगांव तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमार्फत कटीबद्धतेने पार पडत असल्याचे दिसून येत आहे.
त्यासोबतच माणगांव तालुका नाभिक समाज संघ व तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी सलुन संघटना यांनी सलुन बंद ठेवले आहे. दिनांक 19 मार्चपासून माणगांव तालुक्यातील सर्व सलुनधारकांनी आपले सलुन बंद ठेवले आहेत. यासाठी दत्तात्रय (भाऊ) पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मिटींग घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या सभेला जयंत शिंदे जिल्हा संघटक द. रायगड,  कांता हुजरे माणगांव तालुका कार्याध्यक्ष, दिलिप जाधव माणगांव तालुका उपाध्यक्ष, अभि खंडागळे माणगांव शहर उपाध्यक्ष व सौरभ पांडे, अजित हुजरे,  दिपेश जाधव, अमोल जाधव, कृष्णा कदम, प्रविण शिंदे, रुपेश भोसले, राहुल मोरे व सर्व माणगांव तालुक्यातील सलुन चालक-मालक उपस्थित होते.
माणगांव तालुका नाभिक समाजाने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सलुन बंद ठेवण्याच्या घेतलेल्या या निर्णयाबद्दल सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.

Popular posts from this blog