कोरोना पार्श्वभूमीवर आठवडा बाजार बंद, माणगांव करांनी घेतली दक्षता



माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव शहरामध्ये क्रांतीनगर परीसरात दर सोमवारी कै शिवराम (भाऊ) यादव आठवडा बाजार भरविण्यात येतो. या बाजारात कौंटुंबिक जीवनावश्यक घरगुती वापराच्या वस्तू, सुकी मासऴी, ताज्या पालेभाज्या, खाद्यपदार्थ अशा अनेक प्रकारच्या दैनंदीन व गृहउपयोगी वस्तू ग्राहकांना नेहमीच्या बाजारपेठेपेक्षा माफक दरात मिळतात. शिवाय माणगांव शहरानजीक असंख्य ग्रामीण वस्त्या असल्याने शेतकरी वर्ग मोलमजूरी कामगार अशा ग्राहकांची माणगांव आठवडा बाजाराला पसंती असते. दर सोमवारच्या सायंकाऴी 9 वाजेपर्यंत क्रांतीनगर ते साईनगर असा परिसर ग्राहकांच्या मनुष्यवर्दऴीने गजबजलेला असतो.


पण सध्या जगासमोर परीणामी देशासमोर असलेले संकट म्हणजे कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव याची खबरदारी म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला दुजोरा देत शाऴा कॉलेजेसना सुट्टी व जमावबंदी 10 पेक्षा अधिक लोकांचासमुह एकत्र येण्यावर शासनाने घातलेली बंदी याचे अनुकरण म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 16 मार्च 2020 पासून माणगांव नगरपंचायतीमार्फत भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजाराला सुट्टी देण्यात आलेली आहे. ही सुट्टी साधारणपणे 1 एप्रिल पर्यंतची आहे.
माणगांवकराची सुसभ्यता, सुजाणता आणि विविधतेतून एकता अशा गुणांचे दर्शन यापूर्वी ही अनेक बाबींतून दिसून आलेले आहे.


आमच्या प्रतिनिधींनी क्रांतीनगर रहिवासी मंडऴाचे अध्यक्ष अॅड. पंकज खामगांवकर तसेच आठवडा बाजार कमिटीचे अध्यक्ष भुषण शिसोदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजुन आले की, हा आठवडा बाजार कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंधता म्हणून साधारणपणे 2 /3 आठवडे भरणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच माणगांव नगरपंचायत उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक दिलिप (बबडी) जाधव व नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक आणि समस्त माणगांवकरांकडून या खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेल्या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

Popular posts from this blog