महिला दिनानित्त ग्रा. पं. खरवली महिला बचत गटाच्या कार्यक्रमात कचरा कुंड्यांचे वाटप
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खरवली आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत खरवलीच्या प्रांगणात महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषद सदस्या स्वाती नवगणे, माणगांव पंचायत समिती सभापती अलका जाधव, संगिताताई बक्कम, भिडे मॅडम आणि ग्रुप ग्रामपंचायत खरवलीच्या सरपंच मनिषा खडतर, निता करकरे आणि गुळवणी मॅडम आवर्जून उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माणगांव पंचायत समिती माजी सभापती संगिताताई बक्कम यांनी भूषविले. तर सूत्रसंचालन खरवलीच्या पोलीस पाटील सुजाता सुरेश तेलंगे यांनी केले. या महिला दिन तथा महिला मेळाव्यास खरवली पंचक्रोशीतील असंख्य महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींनी मौलिक मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या कार्यक्रमात लहान मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. आयोजकांच्या माध्यमातून 'स्वच्छ भारत सुंदर भारत' हे स्वच्छतेचे ब्रीद जपण्यासाठी उपस्थित सर्व महिलांना कचरा कुंड्यांचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.