उतेखोलगावची चिमुकल्यांची शिमग्याची सोंग लय भारी
बटरं बटरं.... मुंबय वाल्यांची आली मोटरं...
माणगांव (प्रतिनिधी) :
आमच्या उतेखोलगांव माणगांवची ही चिमुकल्यांची खेड्यातील बच्चे कंपनीची शिमग्याची सोंग फारच गंमतीशीर, बटरं बटरं.... मुंबय वाल्यांची आली मोटरं... म्हणत तुफान नाचणारी, खरा आनंद देणारी त्यांची ही झलक नक्की बघा. हेच ते सणांचे वैभव, संस्कृती पिढी दर पिढी अशीच पुढे सरकते हे खुप आनंददायी चित्र आहे. बालपण देगा देवा... कोणतेही भय नाही, लोभ नाही, मत्सर नाही, राग नाही, कपट नाही. नुसती आनंदी उत्साही उर्जा मोदभरे नृत्य... असेच खळखळत्या निर्झर वाहणाऱ्या झऱ्या सारखं निरागस जीवन सध्याच्या तणावग्रस्त युगात माणसाला हवे आहे तरच सुख, समाधान, आरोग्य लाभेल यासाठी सण उत्सव महत्वाचे... होळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा......