माणगांव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिन साजरा
                           

माणगांव (उत्तम तांबे) : माणगांव नगरपंचायतच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे माणगाव नगरपंचायत पटांगणामध्ये जागतिक माहिला दिन या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती माधुरी मोरे, उपसभापती सानिया शेट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेविका भाग्यश्री यादव, रिया उभारे, हर्षदा काळे, शुभांगी जाधव, निलम मेहता, स्नेहा दसवते, अंजली पोवार यांच्या सहकार्याने जागतीक महिला दिन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


माणगांव नगरपंचायत पटांगणामध्ये नव्याने उभारलेला रंगमंचाला लोकनेते दादासाहेब साबळे रंगमंच असे नाव देऊन त्याचे उद्घाटन श्रीमती नंदिनी अशोक साबळे व श्रीमती सुनिता शिवराम यादव या मातेंच्या शुभहस्ते करण्यात आले. इशस्तवनाने मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटऊन प्रबोधनपर मार्गदर्शन केले.


या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची गगनभरारी घेतलेल्या महिलांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.


यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती वंदना अशोक साबळे, श्रीमती सुनिता शिवराम यादव, उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव, तहासिलदार प्रियंका अहिरे, कोकण रेल्वे मोटरमन प्रिया तेटगुरे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरूंगले, दुय्यम निबंधक मंगला सुर्यवंशी, पंचायत समिती सभापती अलका यादव, नाराध्यक्षा योगिता चव्हाण, माणगाव माजी सरपंच कांचन दोशी, माजी उपसरपंच ज्योती बुटाला, माजी सरपंच अपर्णा तिगडे, माजी सरपंच सुनिता धुमाळ, निवृत बँक कर्मचारी मंगला मेहता, भारती महाळुंगे, कराटे मास्टर रतिका गमरे, महिला दक्षता समितीच्या स्मिता मिरजकर, महिला बचतगटाच्या सुमन चव्हाण, लक्ष्मी लांगे, गिता मेहता, शिला जोशी, संध्या जैन, शाहिदा गजगे, संध्या डवले, जयश्री जाधव, नुतन जाधव, निलीमा काप, तारा जाधव, सिद्धी साळुंके, शिल्पा खाडे इत्यादी सत्कारमुर्तींचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.


सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रभाकर उभारे, नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस नेते -महोमद धुंदवारे, नगरसेवक रत्नाकर उभारे, नितीन बामगुडे, सचिन बोंबले, हेमंत शेट, नितीन वाढवळ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र मोरे, जेष्ठ समाजसेवक संजय अण्णा साबळे, संतोष पवार, गणेश चव्हाण, सुमित काळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माहिलांसाठी प्रश्नमंजुशा कार्यक्रम घेऊन बक्षिस वितरणानंतर माणगाव नगरपंचायतीच्या विद्यमाने तीन हजार पाचशे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला माणगाव नगरपंचायत पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Popular posts from this blog