जमावबंदी : 'पोलीस आले' असे ऐकून घाबरून पळाला, बिल्डींगवरून पाय घसरून खाली पडून मृत्यू
रोहा (समीर बामुगडे) :
राजेंद्र अभिमन्यू पाटील (वय ४४, रा. काळुंद्रे) हा व्यक्ती नाहक अफवांचा बळी पडला.
कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे जमावबंदी लागू असताना सुद्धा काळुंद्रे गावातील काही लोकांनी सकाळी जमाव करून नाक्या नाक्यावर गर्दी केली. त्यातील काही लोकांनी पोलीस आले पोलीस आले म्हणून आरडा ओरडा सुरू केला. त्या भीतीने जमावातील लोकांनी मिळेल त्या ठिकाणी पळून जायची सुरवात केली. त्या जमावामधील राजेंद्र अभिमन्यू पाटील या व्यक्तीने सुद्धा पळ काढला व तो एक्का बिल्डींगमध्ये शिरला आणि त्या बिल्डिंग मधील पायऱ्या चढत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला व त्या ठिकाणी त्याच्या मेंदूला जबर मार लागल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
त्यामुळे कोणीही कोणत्याही गावात किंवा शहरात जमावबंदी करू नये आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत ज्यामुळे कोणाचा बळी जाऊन त्याचा संसार उदवस्त होईल. शासनाच्या नियमांचे पालन करून आणि घरी आपल्या परिवारासोबत आनंदात राहणे हेच योग्य आहे.