खोपोली - बोरघाटातील अपघातात 5 जण जागीच ठार
रायगड (किरण बाथम) :
रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास 1) MH 14 CV 0243 , 2) MH 14 FK 4097 , 3) MH 14 FH 5793 या तीन मोटरसायकलवरील एकूण 6 जण तळेगाव एमआयडीसी मध्ये काम करणारे (मूळ रा. लातूर) अलिबाग येथे फिरायला जाऊन परत येत होते.
खोपोली बोरघाटातील अंडा पॉइंट येथे लघूशंकेसाठी थांबलेले असताना पुणे बाजूकडून खोपोली कडे येणारा आयशर ट्रक क्रमांक MH 46 BB 1830 हा ट्रक वरील थांबलेल्या मोटर सायकल स्वार यांच्यावर पलटी होऊन पडला ,
यामध्ये 5 जण जागीच ठार झाले असून त्या 6 पैकी एकजण लघूशंकेसाठी बाजूला गेलेला असल्याने तो बचावला आहे.
अपघातात मयत झालेल्यांची नावे प्रदीप प्रकाश चोले (वय 38), अमोल बालाजी चिलमे (वय 30), नारायण राम गुंडाळे (वय 28), गोविंद ज्ञानोबा नलवाड, निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (वय 28) अशा प्रकारे असून यांपैकी वाचलेल्या व्यक्तीचे नाव बालाजी हरिसचंद्र भंडारे (वय 35) असे आहे. हे सर्वजण मूळचे लातूर जिल्ह्यातील वंजारवाडी ता. अहमदपूर येथील असून सध्या वराळे फाटा तळेगाव पुणे येथे राहणारे आहेत.
अपघाताच्या ठिकाणी बोरघाट महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, अपघातग्रस्त मदतीकरिता स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, IRB ची देवदूत टीम इत्यादींनी मदत कार्यात सहभागी होऊन ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढून तात्काळ खोपोली न.पा.च्या दवाखान्यात रवाना केले आहेत. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.